पाचोरा रेल्वे टिकीट कार्यालय जवळ आढळला मृतदेह बँकेच्या पासबुक वरुन पटली त्याची ओळख.
पाचोरा –
पाचोरा शहरातील रेल्वे तिकीट कार्यालयाजवळ एक अनोळखी इसम मृत अवस्थेत आढळून आला होता. याबाबत पाचोरा जी. आर. पी. मा. श्री. मधुसूदन भावसार यांनी पाचोरा नगरपरिषदेच्या शासकीय रुग्णालयात खबर दिली खबर मिळताच पाचोरा येथील जय मल्हार ॲम्बुलन्स सर्विसचे चालक बबलू मराठे व गोलु शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मयताचा मृतदेह पाचोरा नगरपरिषदेच्या शासकीय रुग्णालयात आणला.
मयताच्या अंगावरील कापड्याची झाडाझडती घेतली असता मयताच्या जवळ सेंट्रल बँक ऑफ इंडिया पिंपळगाव हरेश्वर शाखेचे खाते पुस्तक आढळून आले होते. या पुस्तकावर भिसन किसन गोपाळ वय अंदाजे (७५) वर्षे असे नाव आढळून आले याबाबत ॲम्बुलन्स चालक बबलू मराठे यांनी मयताचा फोटो व बॅंकेच्या खाते पुस्तकाचे छायाचित्रे अंबे वडगाव येथील दिलीप जैन यांना पाठवले त्यांनी लगेचच पिंप्री, कोल्हे, पिंपळगाव हरेश्वर येथील परिसरात तपास केला असता संबंधित इसम हा मुळचा पिंप्री येथील रहिवासी असून काही वर्षांपासून तो कोल्हे या गावी रहात होता. तदनंतर त्यांचा मुलगा नोकरीनिमित्ताने बाहेरगावी गेल्यापासून मयत भिसन गोपाळ हा पिंपळगाव हरेश्वर येथे रहात असल्याची माहिती जनमानसातून मिळाली आहे.
कोल्हे ग्रामस्थांनी ओळख पटल्यानंतर जामनेर येथे रहात असलेला मयताचा मुलगा राजेंद्र याला घडलेली घटना कळवली असून मयताचा मुलगा राजेंद्र, पत्नी शामाबाई मुली व यांनी पाचोरा नगरपरिषदेच्या रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. मयताच्या पाश्चात्य एक मुलगा, तीन मुली व पत्नी असा परिवार आहे. या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर, कोल्हे व पिंप्री गाव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.