आर्वे शिवारातील गुरचरण जमिनीवर शिक्षण संस्थेच्या बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी पाचोरा पोलीसांत गुन्हा दाखल..

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारातील गुरचरण जमिनीवर शिक्षण संस्थेच्या बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी पाचोरा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी सुनील बापु पवार वय 37 यांनी फिर्याद दिली आहे.दिलेल्या फिर्यादीत त्यांनी असे म्हटले आहे की,मी सुमारे 1 महिण्यापासुन पासून वरखेडी बु।। ता. पाचोरा जि जळगाव येथे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. हरिभाऊ तुकाराम पाटील राहणार श्रीराम नगर जामनेर रोड पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांनी दिनांक 12/08/2025 रोजी उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांच्याकडे पाचोरा तालुक्यातील लोहारी बु. ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आर्वे येथील तुळजाई शिक्षण संस्था पाचोरा यांनी शासनाच्या मालकीच्या गट क्रमांक 27 एकूण क्षेत्रफळ 8 हेक्टर 64 आर या क्षेत्रामध्ये कोणती शासकीय परवानगी न घेता त्यांचा मालकी हक्क नसतांना देखील बेकायदेशीरपणे शाळेचे बांधकाम सुरू करून सदर बांधकाम करताना शासनाच्या अवैध वाळूचा गैरवापर करून शाळेचे बांधकाम सुरू असल्याबाबत संबंधित तुळजाई शिक्षण संस्था पाचोरा यांचे सर्व संचालक व संबधीत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, संरंपच, उपसंरपंच यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी केल्याने त्याबाबत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पाचोरा यांनी दि.08.09.2025 रोजी तहसीलदार पाचोरा तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती पाचोरा यांना पाचोरा तालुक्यातील लोहारी बु.ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आर्वे येथील तुळजाई शिक्षण संस्था पाचोरा यांनी शासनाच्या मालकीच्या खुला भूखंडाच्या शासकीय जमिनीवर खाजगी शिक्षण संस्थेने शाळेचे बेकायदेशीर बांधकाम सुरू केले बाबत चौकशी करुन तात्काळ प्रत्यक्ष स्थंळनिरीक्षण करून तिथे असलेले बांधकाम व उपलब्ध असलेले गौण खनिज बाबत संबंधित मंडळाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रस्ताव तयार करून तसेच आवश्यक ती संपूर्ण कारवाई करण्याबाबत मला तसेच ग्राम महसुल अधिकारी आर्वे यांना संबधीतावर गुन्हा दाखल करणेबाबत अवगत करण्यात आलेले होते.त्यानुसार दिनांक 10/09/2025 रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान मा. उप विभागीय अधिकारी पाचोरा सोबत मी व ग्राम महसूल अधिकारी, भुमी अभिलेखचे कर्मचारी, पोलीस विभागाचे पोलीस अमलदार तसेच पोलीस पाटील आर्वेयांनी समक्ष मौजे आर्वे येथील गट क्रमांक 27 चे स्थंळनिरीक्षण करून पाहणी केली असता तळ मजल्याचे बांधकाम होऊन पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू असल्यांचे दिसून आले उपरोक्त गटावर बेकायदेशीरपणे कोणतीही आवश्यक असलेल्या कार्यालयाची अथवा शासनाची पूर्वपरवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकाम केलेले दिसून आले. चौकशी दरम्यान कोणतेही दस्तऐवज बांधकाम परवानगी तसेच गट क्रमांक 27 च्या मालकी हक्काबाबत कोणताही दस्तऐवज उपलब्ध झालेला नाही वास्तविकता गट नंबर 27 च्या 7/12 उताराचे अवलोकन केले असता त्यामध्ये भोगवटादार सदरी महाराष्ट्र शासन नाव नमूद असून इतर हक्कांमध्ये गुरचरण दि 23/02/81 असा शेरा दिसून येतो म्हणजेच सदर जमीन महाराष्ट्र शासनाची गुरुचरणाची असल्याचे निष्पन्न होते त्यामुळे संबंधित तुळजाई शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष दिलीप मुकुंदराव पाटील व निखील दिलीप पाटील यांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध निष्कासीत करणे तसेच फिर्याद दाखल करणे बाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक दिनांक 07/09/2010 अन्वये शासकीय जमिनीवरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे ही सदर जमीन ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या विभागाची जबाबदारी आहे त्यामुळे शासकीय जमिनीच्या बाबतीत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तात्काळ पोलीसात फिर्याद देण्याची दक्षता घ्यावी असे नमूद आहे त्यानुसार आम्ही मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी समक्ष हजर होऊन सर्व शासकीय दस्तऐवजांची शहानिशा करून उपरोक्त शासन निर्णयान्वये तुळजाई शिक्षण संस्था पाचोरा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांचे अध्यक्ष दिलीप मुकुंदराव पाटील व निखील दिलीप पाटील दोन्ही रा. पाचोरा यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 कलम 303 (2), 316, 329 (1), व 329 (3), अनधिकृत प्रवेश व अतिक्रमण कलम 318 (4) फसवणूक कलम 324 (4) (5) शासकीय मालमत्तेचे नुकसान, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 कलम 50, 51, 53 जमिनीवरील अतिक्रमण व बेदखल करण्याचे अधिकारपर्यावरण संरक्षण कायदा, 1986 कलम 15 नुसार माझी 53 व 57 शासनाच्या फिर्याद आहे. सदरचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश ठाकूर हे करीत आहे.





