पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी व्हॉईस ऑफ मीडियाचे भडगाव पोलीस निरीक्षकांना निवेदन; हल्लेखोरांवर कठोर कारवाईची केली मागणी..

भडगाव-
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होणारे हल्ले हे गंभीर असून अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तसेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात आणि त्या हल्लेखोरांना अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी ठाम भूमिका व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने पोलीस निरीक्षक भडगाव यांच्याकडे मांडली.यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल मराठे, जिल्हा सहसंघटक संजय महाजन, तालुकाध्यक्ष अशोक परदेशी, शहराध्यक्ष संजीव शेवाळे, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, शहर सरचिटणीस शिवदास महाजन, तालुका संघटक अमीन पिंजारी, शहर कार्याध्यक्ष गणेश अहिरे, तालुका सरचिटणीस नरेंद्र भोसले, व्हॉईस ऑफ मीडियाचे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.





