जळगाव जिल्हा

महाराष्ट्र एक्सप्रेस व शटलची वेळ पूर्ववत होणार केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार उन्मेशदादा पाटील यांनी नवी दिल्लीत घेतली भेट.

जळगाव –

कोरोना नंतर महाराष्ट्र एक्स्प्रेस व शटल गाडीच्या वेळेमध्ये बदल झाल्याने चाळीसगाव पाचोरा इथून जळगावला जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत होते.या अनुषंगाने सातत्याने खासदार उन्मेशदादा पाटील यांनी निवेदन देऊन रेल्वे राज्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिली. मात्र तरी देखील याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने आज खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून तातडीनं या वेळेत बदल करावा अशी मागणी केली. यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन्ही गाड्यांच्या वेळा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या असून दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, पालक, अधिकारी कर्मचारी व्यापारी जेष्ठ नागरिक यांना दिलासा मिळणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिल्ली येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.


महाराष्ट्र एक्सप्रेस व शटलची वेळ पूर्ववत होणार

खासदार उन्मेशदादा पाटील यांनी नवी दिल्लीत आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेतली.यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र एक्सप्रेस (11039) व शटलची ( 11113) वेळ पूर्ववत करणे, पुणे येथे जाण्यासाठी खान्देश वासियांसाठी नविन थांब्याना मान्यता मिळावी, पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद बरोली एक्सप्रेसला( 19843/44)धरणगाव थांबा,हिसार सिकंदराबाद एक्सप्रेस(22737/38 )धरणगाव थांबा,खान्देश एक्सप्रेस (19003/04) वापी तसेच धरणगाव थांबा तसेच अमळनेर येथे चेन्नई जोधपूर एक्सप्रेस(22663/64) साठी रेल्वेची तत्वतः मान्यता कायम करावी,तसेच भुसावळ येथून पुणे येथे नविन गाडी सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या महिनाअखेर बैठक घ्यावी या विषयांवर मंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!