खडसे महाविद्यालयात एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन.

जळगाव-
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे पीएम उषा योजनेअंतर्गत “एकविसाव्या शतकातील मानवविद्या व वाणिज्य क्षेत्रातील बदलते प्रवाह” या विषयावर दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.या परिषदेच्या उद्घाटक म्हणून डॉ. सुरेखा पालवे (व्यवस्थापन परिषद सदस्य, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव) उपस्थित होत्या. बीजभाषक म्हणून बनारस हिंदू विद्यापीठ येथील समाजविज्ञान शाखेचे माजी अधिष्ठाता प्रा. डॉ. बिंदा परांजपे यांनी मार्गदर्शन केले.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे केवलकर या होत्या. उद्घाटनपर भाषणात डॉ. सुरेखा पालवे यांनी परिषदेच्या विषयावर सखोल विचार मांडले. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. बिंदा परांजपे यांनी मानवविद्या व वाणिज्य शाखेतील विविध क्षेत्रांतील संशोधन विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले, तर परिषदेचे संयोजक डॉ. पी. एस. प्रेमसागर यांनी प्रास्ताविक केले. देशभरातून 226 प्राध्यापक, विद्यार्थी व संशोधकांनी नोंदणी करून सहभाग नोंदविला.
या परिषदेत श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांनी “२१ व्या शतकात आनंदी जीवन आणि नैतिक वाणिज्य या कल्पनेला चालना देणारी कार्यस्थळ संस्कृती निर्माण करण्यासाठी, कर्मचार्यांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. यामध्ये सकारात्मक कार्य वातावरण, लाक्षणिक मूल्ये, आणि समुदायाची भावना यांचा समावेश होतो. नैतिक वाणिज्याला प्रोत्साहन देण्यासाठी, व्यवसायांनी पारदर्शकता, उत्तरदायित्व, आणि सामाजिक जबाबदारी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे व्यवसाय आणि समाज दोन्हींसाठी फायदा होईल अशी संस्कृती निर्माण होईल. ” या विषयाशी संबंधित आपले संशोधन सादर केले. त्यांची संशोधन निबंधाची प्रस्तुती खूपच प्रभावी होती! त्यांच्या कष्टाची आणि समर्पणाची ही एक उत्तम फलनिष्पत्ती होती.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष बी. नारायणदादा चौधरी तसेच इतर संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. संजीव साळवे, प्राचार्या डॉ. वंदना चौधरी, परिषदेचे समन्वयक डॉ. गणेश सदाशिव चव्हाण, संयोजक डॉ. पी. एस. प्रेमसागर तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
तसेच सौ रजनीताई नानासाहेब देशमुख भडगाव महाविद्यालय येथील प्राध्यापिका निशिगंधा बोरसे व एम एम महिद्यालय पाचोऱ्याचे प्रा. स्वप्निल भोसले उपस्थित होते.



