जळगाव जिल्हा
जितेश उखर्डू राजपूत हे घरात कोणास काहीएक न सांगता बेपत्ता.

जामनेर-
जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी जितेश उखर्डू राजपूत (वय३९) दिनांक २२ फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून कोणास काहीएक न सांगता बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत त्यांची पत्नी राधा जितेश राजपूत यांनी पोलीस स्टेशन येथे मिसींग झाल्याची तक्रार दिली आहे.

बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे वर्णन
रंगाने सावळा,उंची ५”५ इंच शरीराने मध्यम, उजव्या हातावर मराठी मध्ये जितेश,मॉ नाव गोंदलेले,अंगात गुलाबी रंगाचे शर्ट,खाकी रंगाची फुल पॅन्ट काळा रगांचे स्वेटर आहे.
मिसींग बाबत अधिकचा तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार पो.हे.कॉ.राजु तायडे करीत आहे.
वरील वर्णना प्रमाणे व्यक्ती आढळून आल्यास जामनेर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.किंवा 7821982273 संपर्क करा.




