माझ्या बाबत जे षडयंत्र झाले ते मी कदापि विसरणार नाही व ज्यांनी केले त्यांना सोडणार ही नाही-माजी आमदार दिलीपभाऊ वाघ
पाचोरा-
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित समर्थक व हितचिंतकांच्या मेळाव्यात येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करून दिलीप वाघ यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
सारोळा रोडवरील समर्थ लॉन्समध्ये मेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दिलीप वाघ यांना रिंगरोड वरील निवासस्थानापासून मेळावा स्थळापर्यंत घोषणाबाजी करत बाईक रॅलीने आणण्यात आले. राजे छत्रपती संभाजी स्मारक , छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा , महात्मा फुले स्मारकात पूजन करण्यात आले. मेळाव्यास्थळी त्यांचे आगमन होताच फटक्यांची आतिषबाजी व घोषणाबाजी करण्यात आली.
व्यासपीठावर दिलीपभाऊ वाघ , संजयनाना वाघ , दगाजीआण्णा वाघ , डिगंबर पाटील , मानसिंग पाटील , शांताराम सोनजी पाटील , शालिकग्राम मालकर , हर्षल पाटील , ललित वाघ , सिताराम पाटील , सतीश चौधरी , मधुकर पाटील , अर्जुनदास पंजाबी , रमेश चौधरी , खलील देशमुख , शेख रसूल , विनय जकातदार , व्ही टी जोशी , योगेश पाटील , विकास पाटील , नितीन तावडे , शशिकांत चंदिले , वासुदेव महाजन , अशोक मोरे , दत्तात्रय पवार , शिवदास पाटील , सुदाम वाघ ,संजय एरंडे , मनोज वाघ , मयूर वाघ , विजय पाटील , शामकांत भोसले ,बशीर बागवान , रणजीत पाटील , पी डी भोसले , भूषण वाघ , ॲड अविनाश सुतार , हारुण देशमुख , शशिकांत चंदिले , राहुल पाटील , कुणाल पाटील , भूषण पाटील , नाना देवरे , अजहर खान , बापू सोनार , सुचिताताई वाघ ,ज्योतीताई वाघ , ऍड अभिलाषा रोकडे ,सरलाताई पाटील ,प्रमिलाताई वाघ , रेखाताई पाटील , रेखाताई देवरे , सुरेखाताई पाटील , संध्याताई बोरसे , श्रद्धाताई गायकवाड आदि पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज व कै. ओंकार आप्पा वाघ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
बदलापूर येथील बालिकां वरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला. त्यानंतर पाचोरा व भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने 58 दिवे पेटवून दिलीप वाघ यांचे औक्षण करण्यात आले.विविध स्थानिक स्वराज्य संस्थां पदाधिकाऱ्यां तर्फे देखील दिलीप वाघ यांना सन्मानित करण्यात आले .याप्रसंगी हर्षल पाटील , प्रा भागवत महालपुरे , नितीन तावडे , सिताराम पाटील , अजहर खान , शालिक मालकर , विनय जकातदार यांची भाषणे झाली . आपल्या मनोगतात दिलीप वाघ यांनी कै . ओंकार आप्पा वाघ यांचेसह वाघ कुटुंबीयांच्या समाजकारण व राजकारणाचा आढावा घेतला .निवडणुकीच्या तोंडावर अनेकांना आमदारकीचे वेध लागले असून राख्या , साड्या व रुद्राक्ष यांची लयलूट केली जात आहे. ज्यांना मतदारसंघ कळाला नाही त्यांनी आमदारकीचे स्वप्न पाहणे हाश्यास्पद असल्याचे सांगून मी आमदारांशी जुळवून घेतले असा अपप्रचार करून माझे नेतृत्व बदनाम करण्याचा विरोधकांनी प्रयत्न चालवला आहे. गतकाळात माझ्या बाबत जे षडयंत्र झाले ते मी कदापि विसरणार नाही व ज्यांनी केले त्यांना सोडणारही नाही. मध्यंतरीच्या काळात काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आमदारां सोबत काम करण्याचा जो प्रसंग आला तो वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या युती आघाडीमुळे आला. विकासाचा कांगावा करणाऱ्यांनी रस्ते व पूलच का बांधले ? कारण त्यामध्ये टक्केवारी जास्त असते. भाऊ बहीण प्रवेश सोहळे करून एकमेकांना धक्के देत आहेत. पण आता जनताच त्यांना धक्का देणार असून आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्यांना माझीच मोठी भीती असल्याने माझ्या संदर्भात चुकीच्या गोष्टी प्रसारित करून दिशाभूल केली जात आहे. स्वातंत्र्यानंतर मतदार संघात प्रथमच विकास कामे झाली असे आमदार म्हणतात मग मतदारसंघातील सिंचन प्रकल्प , वीज केंद्र , खत कारखाना , बस स्टॅन्ड , औद्योगिक वसाहत , वेगवेगळी धरणे कोणी उभारली? हे एकदा आमदारांनी सांगावे.टक्केवारीचे राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये .2011 मध्ये माझ्या बदनामीचा खेळ खेळणाऱ्यां सोबत मी कदापी जाणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी मी सज्ज असल्याचे सांगून साठ वर्षांपासून वाघ घराणे समाजसेवेत सक्रिय आहे. सत्ता असो वा नसो लोकसेवा आमचे व्रत असल्याचे स्पष्ट केले. प्रवेश सोहळे करून एकमेकांना धक्के देणाऱ्यांना आता जनताच धक्का देऊन घरी बसवणार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांच्या बळावर विधानसभा निवडणुकीसाठी आपण सज्ज आहोत असे सांगतात उपस्थितांनी प्रचंड घोषणाबाजी करत प्रचंड बहुमताने विजय मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी राजकीय वारसा हक्काने आम्ही कमावली आहे.व तीच आमची संपत्ती आम्ही मानतो असे स्पष्ट करून येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचे संकेतही दिले . विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. माणिक पाटील यांनी सूत्रसंचलन केले .रणजीत पाटील यांनी आभार मानले.