क्राईमजळगाव जिल्हा

जळगाव!कामगार निरीक्षकास लाच घेताना,रंगेहाथ पकडले..

Pachora|बांग्लादेशात उरण मध्ये घडलेल्या घटनेचा विश्वहिंदू परिषद बजरंगदलाच्या वतीने तीव्र निषेध

जळगाव-

येथील सह कामगार आयुक्त कार्यालयात कामगार निरीक्षकाने मुकादम पदावर दिलेली स्थगिती हटवण्यासाठी व सहाय्यक कामगार आयुक्तकडे असलेल्या सुनावणीचा निकाल बाजूने लावण्याकरिता तक्रारदाराला ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी ३६ हजार रुपये घेताना कामगार निरीक्षकाला जळगाव ‘लाचलुचपत’ने रंगेहाथ अटक केली. चंद्रकांत पंडितराव पाटील (वय ५७, रा.जळगाव) असे या कामगार निरीक्षकाचे नाव आहे.

शहरातील तक्रारदार माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष व मुकादम आहे. तक्रारदाराचे मित्र सुद्धा मुकादम होते. त्यांच्या मुकादम पदावर स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू होती. सुनावणीचा निकाल लावण्यासाठी मी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून निकाल लावून देतो, मात्र मला ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे तक्रारदारास सांगितले. तडजोडीअंती ३६ हजाराची लाच देण्याचे ठरले. तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

त्यानंतर पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पो.नि.एन.एन.जाधव,पीएसआय दिनेशसिंग पाटील,पो.हे.कॉ. सुरेशपाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन,पो.ना. सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. सचिन चाटे यांनी सापळा रचला. व लाच घेताना चंद्रकांत पाटील यास रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!