क्राईमराज्य

मुंबईत १३ वर्षांच्या मुलीवर बापानेच केला लैंगिक अत्याचार,मुलगी ८ महिन्यांची गरोदर..

मुंबई-

मुंबईतल्या गोवंडी मध्ये १३ वर्षीय मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.
बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. पीडित तरुणी ८ महिन्यांची गरदोर राहिली आहे. मुंबईतल्या गोवंडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनमुळे मुंबई हादरली आहे. या प्रकरणी नराधम बापाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार, बापाने आपल्या १३ वर्षीय पोटच्या मुलीवर बलात्कार केला. मुलगी ८ महिन्यांची गरोदर राहिली आहे. बलात्काराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पीडित मुलीने कुणालाही सांगितले नाही. पण पोटात दुखत असल्यामुळे मुलीला रुग्णालयात नेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ३६ वर्षीय नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. भारतीय न्याय संहिताकलम ६४ (२) (एफ), ६४ (२) (एच), ६४ (२) (आय), ६४ (२) (एम), ३५१ (३) आणि ६९ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ४, ६, ८, १२ अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!