Blog

भातखंडे ता.भडगाव येथील डॉ. अनिल महाजन व सौ. भारती महाजन सन्मानित



भडगाव (प्रतिनिधी)

डॉ.अनिल महाजन सोबत त्यांची धर्मपत्नी सत्कार स्विकारतांना

भातखंडे ता. भडगाव येथील रहिवासी डॉ. अनिल रघुनाथ महाजन व सौ भारती अनिल महाजन यांना नुकतेच पाचोरा येथे पाचोरा मेडिकल असोसिएशनच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
शहरातील जे डॉक्टर दांपत्य ज्यांची मुलं, मुली वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेले आहेत. अशा पाल्यांच्या यशाबद्दल पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यात त्यांची मुलगी कु. इशा अनिल महाजन तिची नुकतीच नाशिक येथील गव्हर्नमेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे एकूण ५२ डॉक्टर त्यांच्या परिवारासह त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या ह्या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!