कोपरगांव पोलीसांनी सराईत गुन्हेगारांना जेरबंद करत 27,000 हजार रु.रोख रक्कम जप्त करत केली कारवाई.

कोपरगांव –
पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला पोलीस श्रीमती स्वाती मॅडम, अप्पर पालीस अधिक्षक श्रीरामपूर मा. श्री संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांना दिलेल्या आदेश व सूचनांनुसार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे पोलीस स्टाफच्या मदतीने हद्दीतील मालाविरुध्दचे घडलेल्या गुन्ह्यांतील आरोपीतांचा शोध घेणेची कार्यवाही करीत आहेत.
कोपरगाव तालुका पो.स्टे. गु.र.नं. 0011/2023 भा.द.वि.क. 457, 380 प्रमाणे दिनांक 04-01-2023 रोजी 10:20 वा. दाखल केला आहे. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीने मंदिरातील दानपेटीतील रोख रक्कम चोरुन नेल्या बाबत सात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील आरोपीतांचा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे मदतीने शोध घेत असताना त्यांचेकडील माहितीवरुन सदर गुन्हयात (1) धनंजय प्रकाश काळे वय 25 रा. भोजडे चौकी ता. कोपरगाव (2) भगवान दिलीप परदेशी वय 36वर्षे रा. शिर्डी ता. राहाता (3) राहुल केवलसिंग लोदवाल वय 32 वर्षे रा. बेलापूर ता. श्रीरामपूर यांना सदर गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यांतील आरोपींनी महेश्वर मंदिर कोळपेवाडी ता. कोपरगाव येथुन चोरुन नेलेल्या रक्कमेपैकी 7,500 रुपये रोख रक्कम काढुन दिली आहे.
तसेच वरील आरोपींनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील केलेल्या गुन्हयांची कबुली दिलेली
आहे.
कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 73/2023 भा.द.वि.क 457,380 प्रमाणे तळेगाव तळे ता.कोपरगाव येथील शनैश्वर मंदिरातील दान पेटीतील चोरुन नेलेल्या रक्कमेपैकी 18000/- रुपये रक्कम काढून दिले आहे. कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 60/2023 भा.द.वि.क. 457, 380 प्रमाणे मायगाव देवी ता. कोपरगाव येथील श्री रेणुका माता मंदिरातील चोरुन नेलेल्या रोख रक्कमेपैकी 1500/- रुपये रोख रक्कम काढुन दिलेली आहे
सदरची कौतुकास्पद कामगिरी श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मा. श्री संदीप मिटके सो उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल. पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार सुरेश गागरे, पो.हे.कॉ संदीप बोटे, पो.ना. संतोष लांडे, पो कॉ अनिश शेख, पो कॉ अंबादास वाघ, पो. कॉ. राघव कोतकर, पो. कॉ. रमेश झडे. पोको अमोल फटांगरे, चालक पो. ना. रामा साळुंके यांचे पथकाने केली आहे.