क्राईमजळगाव जिल्हा

पाचोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई! 5 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव-

दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अवैध मद्य विक्री तसेच निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सर्वत्र जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने सुरू असून यामध्ये पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील साहेब तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी जामनेर-बोदवड रस्त्यावर अवैधपणे ताडी(मद्य) वाहतूक करणारी मारुती इको गाडी क्रमांक एम एच 02 एफ इ 9947 या क्रमांकाची गाडी जप्त करून यामधील 400 लिटर तयार ताडी व आरोपी नामे मोहमद अजीद यास ताब्यात घेण्यात आले असुन महाराष्ट्र दारूबंदी कायदा1949 चे कलम 65अ, ई अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत पुढील तपास दुय्यम निरीक्षक विलास पाटील करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!