जळगाव जिल्हा

पोलीस बॉईज असोसिएशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी नदीम शेख यांची नियुक्ती!संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केली नियुक्ती.

जळगाव-

पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद तानाजी वाघमारे यांच्या आदेशानुसार आज दिनांक 13 / 02 / 2024 मंगळवार रोजी पाचोरा येथील रहिवासी असलेले नदीम शकील शेख यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नदीम शेख यांनी या अगोदर पोलीस बॉईज असोसिएशन जळगाव जिल्हाध्यक्ष पद तसेच पाचोरा तालुका अध्यक्ष पद भूषविले होते त्यामुळे पोलीसांसाठी आजवर त्यांनी केलेली कामे पाहता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी नदीम शेख यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.
नदीम शेख यांच्या निवडीबद्दल जळगाव, नाशिक ,मालेगाव, धुळे आदी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!