वृध्दाने केला ३५ वर्षीय अपंग तरुणावर अत्याचार पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल,वृध्दास केली अटक..

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील एका गावात ७१ वर्षीय,वृद्धाने ३५ वर्षीय अपंग तरुणावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अपंग तरुणाच्या वडिलांनी पाचोरा पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्या वृद्धाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी वृद्धास ताब्यात घेतले आहे.
अपंग तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावात दि. १८ मार्च रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास आरोपी वृद्धाने फिर्यादिच्या अपंग मुलावर अत्याचार केला. फिर्यादीचा मुलगा हा ५० टक्के अपंग असताना त्याच्याशी गोड बोलुन त्याला गावालगतच्या मक्याच्या शेतात घेऊन जात वृद्धाने त्याच्यावर अत्याचार केला. या वेळी तरुणाने विरोध केला असताना त्यास आरोपीने जिवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर अत्याचार केला.तरुणाने आरडाओरड केली असता शेतातील लोकांनी धाव घेतली. या वेळी आरोपी वृद्ध घटनास्थळावरून पसार झाला होता, अशी फिर्याद तरुणाच्या वडिलांनी पाचोरा पोलिसात दिली आहे.फिर्यादीनुसार आरोपी वृद्ध देवराम भगा सोनवणे (वय ७१) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस पोलिसांनी तत्काळ अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी हे करीत आहेत.