Blog

श्री.गो.से.हायस्कूल मध्ये कर्तव्यपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न..

पाचोरा–
पा.ता.सह.शिक्षण संस्थेच्या श्री.गो.से.हायस्कूल. पाचोरा मध्ये आज दिनांक 28 /2 /2026 शनिवार रोजी किमान कौशल्य विभागातील ज्येष्ठ शिक्षक डी.व्ही .पाटील व नाईक पदावर कार्यरत असलेले श्री.संजय वामन पाटील. या दोघांचा सेवापूर्ती समारंभ कलादालन मध्ये संपन्न झाला.या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा पाचोरा-भडगाव तालुक्याचे माजी आमदार भाऊसो.दिलीप भाऊ ओंकार वाघ, चेअरमन नानासो संजय वाघ, शालेय समितीचे चेअरमन दादासाहेब खलील देशमुख, ज्येष्ठ संचालक सतीश नारायण चौधरी, योगेश माधवराव पाटील,पिंपळगाव-हरेश्वर येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश पाटील व विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.आर.पाटील. व उपमुख्याध्यापक आर.एल.पाटील.उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात रुपेश पाटील यांनी इशस्तवनाने केली. डी व्ही पाटील सर व संजय वामन पाटील या दोघांचा विद्यालयाच्या वतीने सपत्नीक शाल, श्रीफळ व ड्रेस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक एन.आर.पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच उपमुख्याध्यापक आर.एल.पाटील.यांनी दोघांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला.त्यानंतर किमान कौशल्य प्रमुख मनीष बाविस्कर यांनी डि.व्ही.पाटील सर यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.संस्थेचे अध्यक्ष  भाऊसो दिलीप ओंकार वाघ यांनी दोघांच्या कार्याबद्दल गौरवद्वार करून शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणात शालेय समितीचे चेअरमन दादासो खालील देशमुख यांनी डि.व्ही.पाटील सर व संजय वामन पाटील यांनी केलेल्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढून समाधान व्यक्त केले.या सत्कार सोहळ्यास उत्तर देताना डि.व्ही. पाटील यांनी संस्थेने वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त करून याही पुढे संस्थेसाठी काम करण्यासाठीचे अभिवचन दिले. संजय वामन पाटील यांच्या मुलगा सोहम पाटील याने आपल्या वडिलांच्या सेवापुर्ती निमित्त संस्थेचे ऋण व्यक्त करून वडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमास माजी पर्यवेक्षक श्री.शांताराम चौधरी,  ए.जे.महाजन. तसेच सकाळ व दुपार क्षेत्रातील सर्व शिक्षक बंधू -भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सेवापूर्ती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख  महेश कौडिण्य सर यांनी केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!