जळगाव जिल्हा

डेंग्यू,मलेरीया, साथीच्या रोगांवर प्रतिबंधक कारवाई करावी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रशासक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन युवा फाऊंडेशन पाचोरा यांचे निवेदन.

पाचोरा-

शहरात डेंग्यू ,ताप, मलेरीयाची साथीत दिवसेंदिवस वाढ होत आहे सदर रोगांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे झाले आहे.
डेंग्यू, मलेरिया, आणि साथीच्या रोगावर प्रतिबंधक कारवाई करण्याबाबत पाचोरा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रशासक श्रीमती शोभा बावीस्कर मॅडम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन युवा फाऊंडेशनच्या वतीने निवेदन. देण्यात आले.
सदर निवेदन त्यांनी असे म्हटले आहे की,आपल्या पाचोरा शहरात डेंग्यू, मलेरिया, आणि रोगराई ने थैमान घातले आहे.

विशेष म्हणजे पाचोरा शहरात मागासवर्गीय वार्ड पाहिजे त्या प्रमाणात फवारणी औषधी, स्वच्छता, दिसून येत नाही कारण मागासवर्गीय वार्डात डेंग्यू, मलेरिया, या साथीच्या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तरी आपण सदर निवेदनाच्या गांभीर्य पूर्वक विचार करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा संघटनेच्या माध्यमातून सदर घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात येईल.
सदरचे निवेदन देते वेळी आकाश नन्नवरे,अजय शिरसाठ, भिमराव खैरे, सचिन शिरसाठ, सचिन देहडे, रविंद्र लहसे, विकास सोनवणे, किशोर डोंगरे, सचिन जगताप,दिपक आदीवाल,सागर गायकवाड, अशोक मोरे. यांचा सह परीसरातील नागरीक उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!