राज्य

नाशिक सिडकोत मोबाईल चा भिषण स्फोट ३जण जखमी.

नाशिक-


नाशिक सिडकोत उत्तमनगर भागातुन एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक मधील सिडको उत्तमनगर मध्ये मोबाईलचा भीषण स्फोट होवून ३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना उत्तमनगर सिडकोत उघडकीस आली आहे. शहरातील उत्तमनगर परिसरात सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या स्फोटामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुषार जगताप, बाळकृष्ण सुतार आणि शोभा जगताप अशी जखमींची नावे आहेत. हा मोबाईल स्फोट इतका भीषण होता की घराचे मोठे नुकसान झाले असून स्फोट झालेल्या घराच्या काचांसह आजूबाजूच्या काचाही फुटल्या. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. स्फोट कसा झाला याबाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेने परिसरातील नागरिंकामध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!