जळगाव जिल्हाराजकीय

अमोल शिंदे यांचे नेतृत्वाखाली त्र्यंबक नगर येथील युवा ब्रिगेड चा भारतीय जनता पार्टीत प्रवेश


पाचोरा-

येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांच्या बहुआयामी नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचोरा शहरातील त्र्यंबक नगर भागातील युवकांनी दिनांक 9 जुन रविवार रोजी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. अमोल भाऊ शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्याला भाजपा शहर अध्यक्ष दिपक माने, सरचिटणीस जगदीश पाटील, समाधान मुळे, किशोर आबा पाटील, भोला पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी विधानसभेचे लक्ष डोळ्यासमोर ठेवत भारतीय जनता पार्टीने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील युवकांची मोठी फळी युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांच्या पाठीशी उभी राहत आहे. या मोर्चे बांधणीचा एक भाग म्हणून शहरातील त्र्यंबक नगर भागातील युवकांनी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपामध्ये प्रवेश केला. यात समाधान अभिमन पाटील, राहुल पाटील, सागर पाटील, राहुल चौधरी, रवी चौधरी, भारत पाटील, सुरेश पाटील, रवी बडगुजर , योगेश पाटील, दादू पाटील, रोहित पाटील, विराज पाटील, भरत पाटील, अमोल चौधरी, निलेश महाजन, राकेश गायकवाड, भैय्या पाटील आणि गणेश भोई आदी युवकांचा समावेश आहे. या निमित्ताने शहराध्यक्ष दीपक माने व तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी समस्त युवा ब्रिगेडचे स्वागत केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!