जळगाव जिल्हा

पाचोरा तालुक्यातुन 2 वर्षीय बालिकेसह विवाहिता बेपत्ता.

पाचोरा-

2 वर्षीय बालिकेसह विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना पाचोरा तालुक्यात घडली असून पतीच्या फिर्याद वरून पाचोरा पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील विवाहिता ही कोणास काही न सांगता तिच्या 2 वर्षीय बालिकेसह  दिनांक 03/03/2025 रोजी दुपारी 01/30 वाजेच्या सुमारास राहत्या  घरातून निघून गेली आहे.पतीसह नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतु आढळून आली नाही म्हणून पाचोरा पोलिसात पतीने दिलेल्या फिर्याद वरून मिसिंग दाखल करण्यात आली आहे. बेपत्ता विवाहितेचे वय-26 वर्षे असून उंची 5 फुट 2 इंच, शरीर बांधा मजबुत, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे मोठे, केस काळे लांब, अंगात साडी गुलाबी रंगाची, तसेच डाव्या हाताच्या अंगठा व पहिले बोट 5 आणि D असे गोंधलेले आहे. बालिकेचे वय२वर्षे,रंग गोरा, डोक्यावर काळे बारीक केस, डोळे मोठे, नाक सरळ,उंची अंदाजे 2.5 फुट, अंगात फिकट गुलाबी फ्रॉक, पायात लाल रंगाचे बुट असे वर्णन आहे.वरील वर्णनाची बेपत्ता विवाहिता आढळून पाचोरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोना हरिष अहीरे हे करीत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!