जळगाव जिल्हा

राज्यस्तरीय कला प्रदर्शनात पाचोरा येथील अनिल दादा देशमुख कला महाविद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांच्या ७ कलाकृतींची निवड.

पाचोरा-

राज्यस्तरीय कला प्रदर्शनात पाचोरा येथील अनिल दादा देशमुख कला महाविद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांच्या ७ कलाकृतींची निवड..
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, महाराष्ट्र शासन आयोजित राज्य कला प्रदर्शनात अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांच्या ७ कलाकृतींची निवड झाली.
दरवर्षी कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे महाराष्ट्रातील कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय कला प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या वर्षाचे ६५ वे राज्य कला प्रदर्शन, कला विश्व महाविद्यालय, सांगली येथे दिनांक १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे
दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्राप्त होतात. त्यामधून काही निवडक कलाकृती प्रदर्शनात दिग्गज चित्रकार यांच्यामार्फत निवड केली जाते. व त्या प्रदर्शित केल्या जातात, यावर्षी राज्यातील विविध कला संस्थान कडून ३४९० विद्यार्थ्यांच्या सुमारे ५६८० कलाकृती प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त झालेल्या कलाकृतींपैकी १२७५ कलाकृती कला विश्व महाविद्यालय सांगली येथे प्रदर्शनात मांडण्यात आल्या. त्या प्रदर्शनात पाचोरा देशमुख कला महाविद्यालयाच्या ए टी डी प्रथम वर्ष नेहा पाटील या विद्यार्थिनी ने द्विमित संकल्प , डिझाईन या विषयात घड्याळ हे घटक घेऊन आकर्षक रचना करून शीत उष्ण रंगसंगतीत सुंदर अशी डिझाईन केली,तसेच सारिका पाटील या विद्यार्थिनींनी संगीत हे घटक घेऊन संगीतातील स्वर व्यक्तीच्या खूप जवळीक जसे काही व्यक्तीशी बोलत आहेत असे छान  सुंदर रचना तयार केली व डिझाईन मध्ये खुप बारकावे कामात दाखवले आहेत, व वैष्णवी कोळी या विद्यार्थिनींनी ग्रामीण भागातली महिला जात्यावर दळण दळत आहे हे पेन्सिल या माध्यमातून वास्तवादी पद्धतीत अचूक प्रकाशाचा अभ्यास दाखवला. एटीडी द्वितीय वर्ग मधून भुमी पाटील या विद्यार्थिनीने शेतकरी जीवनावर केळीचे पान भाकरी ,कांदा , मिरची या ऑब्जेक्टड्रॉइंग मध्ये वास्तववादी पद्धतीत खूप सुंदर असे जल रंग या माध्यमातून अप्रतिम असे वस्तू चित्र तयार केले, तसेच दिशा ठाकूर या विद्यार्थिनीने २ कलाकृती ची निवड, रचना चित्रामध्ये शृंगार हा विषय घेऊन महिलेचे शृंगार करताना अलंकारिक शैली खूप सुंदर असे पिक्टटोरियल डिझाईन तयार केले आहे, व अश्विन कुमार या विद्यार्थ्यांनी जुनी चहाची कॅटली सफरचंद व मागील कापड हे वस्तू चित्र ब्लॅक पेन या माध्यमातून स्टिपलिंग मध्ये वास्तववादी  पद्धतीत केले आहे.
अनिल दादा देशमुख कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य कला प्रदर्शनाची निवडीची परंपरा कायम राखली आहे. प्रदर्शनामध्ये सांगली येथील प्राचार्य दादासो बाळासाहेब पाटील सर, प्रा. मधुकर कराळे , सुनील लोहार, पाचोरा कॉलेजचे प्राचार्य संदीप पाटील व प्रथम वर्ष द्वितीय वर्ष वर्गातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यानिमित्त संस्थेच्या अध्यक्ष सौ कुसुम नरेश मित्रा, सचिव नरेश मित्रा, महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप पाटील व तालुक्यातील चित्रकार मंडळी व पालकांनी  विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्यात.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!