जळगाव जिल्हा
निवडणूक बंदोबस्त कामी पाचोरा येथील 35 होमगार्ड गडचिरोलीत दाखल.

पाचोरा-
जळगाव जिल्हा समादेशक अधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते साहेब यांच्या आदेशान्वये व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय येरुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथील होमगार्ड समादेशक अधिकारी चंद्रकांत महाजन , प.नायक मनोज पाटील यांच्यासह 34 पुरुष होमगार्ड गडचिरोली निवडणूक बंदोबस्त कामी गडचिरोली येथे दाखल झाले. तसेच जळगाव जिल्ह्यातील पर्यवेक्षक अधिकारी यांनी गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री निलोत्पल साहेब यांची भेट घेऊन बंदोबस्त बाबत रिपोर्ट केला.