जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात आज”श्रीराम क्रिटिकल केअरचा होणार शुभारंभ, उपस्थित राहण्याचे केले आवाहन..


पाचोरा-

पाचोरा शहरामधील भडगाव रोडवरील श्री. सिध्देश्वर महादेव मंदिराच्या समोर आज “श्रीराम क्रिटिकल केअर” या प्रतिष्ठान चे मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात येत आहे.

तरी यानिमित्ताने आज दिनांक 20 फेब्रुवारी 2025 गुरुवारी स. 11:00 वा. पाचोरा शहर आणि तालुक्यामधील सर्व डॉक्टर्स, पाचोरा मेडिकल असोसिएशन, पाचोरा लॅब असोसिएशन, पाचोरा शहर तसेच तालुक्यातील सर्व सन्माननीय व प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीमध्ये पाचोरा, भडगाव तालुक्याचे लाडके, लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते हॉस्पिटलचे उद्धाटन पाचोरा, भडगाव तालुक्याचे माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या शुभहस्ते आय.सी. यू. कक्षाचे, निर्मल सिड्सच्या संचालिका, मा. श्री.उ.बा.ठा.  शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते मेडिकलचे आणि भा.ज.प.चे तालुकाध्यक्ष मा. श्री. अमोल शिदे यांच्या शुभहस्ते डॉक्टर प्रतिष्ठान चे उद्घाटनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.तरी सर्व मान्यवरांनी या श्रीराम क्रिटिकल केअर या नुतन प्रतिष्ठान च्या श्री गणेशासमयी  उपस्थित राहुन आमच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा… द्याव्यात असे आवाहन डॉ. मयुर ब्राबस, डॉ. संकेत विसपुते, डॉ. अंजली विसपुते, डॉ. विशाल पाटील, डॉ. प्रियंका पाटील, डॉ.अजयसिंग परदेशी, डॉ.नेहा परदेशी, डॉ.अभिषेक जगताप यांनी केले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!