जळगाव जिल्हा

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र तालुका अमळनेर चा वतीने सरपंच,उपसरपंच,सदस्यांचा तालुकास्तरीय मेळावा सत्कार संपन्न.


अमळनेर-

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र तालुका अमळनेर यांचे वतीने सरपंच, उपसरपंच व सन्माननीय सदस्यांचा तालुकास्तरीय मेळावा तसेच नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ मराठा मंगल कार्यालय अमळनेर येथे संपन्न झाला .नमूद मेळाव्याचे उदघाटन मा. नामदार श्री अनिल दादा पाटील ,मदत व पुनर्वसन मंत्री म. रा. मुंबई यांच्या शुभहस्ते करण्यात आले .नमूद कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री दत्ताभाऊ काकडे ,प्रदेशाध्यक्ष सरपंच परिषद मुंबई हे होते,तर माजी आमदार श्री शिरीष दादा चौधरी ,राज्य कोर कमिटीची सदस्य श्री.आबासाहेब सोनवणे, राज्य कमिटीचे प्रमुख श्री जे डी टेमगिरे साहेब, नाशिक विभागीय अध्यक्ष श्री राजमल भागवत ,उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष सौ सुषमाताई देसले पाटील ,जिल्हाध्यक्ष श्री बाळूभाऊ धुमाळ, श्री श्रीकांत पाटील जिल्हा समन्वयक ,श्री सुरेशतात्या पाटील कार्याध्यक्ष एनसीपी अमळनेर,श्री नितीन पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती श्री हिरालाल पाटील संचालक बाजार समिती यांचे प्रमुख उपस्थितीत झाला.मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सरपंच यांचे अधिकार अत्यंत मौलिक व महत्त्वाचे आहेत ,व खऱ्या अर्थाने ग्रामविकास चक्र सरपंच यांचेच हातात असते,असे नमूद केले.तसेच सरपंच परिषद च्या माध्यमातून सर्व सरपंच उपसरपंच तसेच महिला सदस्यांना अधिक सक्षम करून त्याना योग्य ती मदत पुरविण्यात येत असते .नमूद सरपंच परिषदेच्या मेळाव्याचे आयोजन विभागीय अध्यक्ष सौ सुषमाताई देसले पाटील यांचे मार्गदर्शनात अमळनेर तालुका अध्यक्ष श्री महेंद्र बोरसे, जिल्हा समन्वयक श्री चंद्रकांत पाटील, व सौ कल्याणी पाटील,महिला तालुका अध्यक्ष सौ शितल पाटील यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री महेंद्र पाटील यांनी केले.नमूदप्रसंगी नवीन पदाधिकारी याना नियुक्ती पत्र ही देण्यात आले . नमूद मेळाव्यास सरपंच उपसरपंच सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!