क्राईमराज्य

एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला;तरुणी गंभीरीत्या जखमी,

पनवेल-

नवी मुंबई आणि उरण शहरातील हत्या प्रकरण ताजे असतानाच पनवेल तालुक्यातील न्हावे गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाला आहे.

पनवेल तालुक्यातील न्हावे गावातील प्रीतम म्हात्रे या तरुणाने एकतर्फी प्रेमातून २४ वर्षीय तरुणीच्या डोक्यात लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. सदर तरुणी गंभीरीत्या जखमी झालेली असून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या गंभीर प्रकरणाने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सदर तरुणीला २ वर्षांपूर्वी हल्ला करणाऱ्या तरुणाने प्रपोज केले होते. परंतु तरुणीने त्यावेळी त्याला नकार दिला होता. याचा राग मनात ठेऊन न्हावे गावाजवळ माणिकटोक समुद्रकिनारी २६ जुलै रोजी सदर तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसली असताना प्रीतम म्हात्रे त्यांच्या जवळ जात,त्याने काही कळण्याच्या आताच लोखंडी रॉडने तरुणीच्या डोक्यात व पाठीवर जिवघेणा हल्ला केला.

ह्या हल्ल्यात तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तरुणीच्या डोक्याला १० टाके पडले असून ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. या घटनेनंतर न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!