अखेर डोक्यात फरशी मारणाऱ्या कपाशी व्यापाऱ्यावर पाचोरा पोलीसांत गुन्हा दाखल
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे कपाशीची गाडी भरणाऱ्या मजुरांचा डोक्यात फरशी मारुन दुखापत करणाऱ्या त्या व्यापाऱ्या विरोधात पाचोरा पोलीसांत गुन्हा दाखल.जखमीवर सध्या जळगाव येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.
या बाबत शाहरुख हानीफ पठाण वय 30 राहणार अंतुर्ली खु.फिर्याद दिली अंतुर्ली खुर्द तालुका पाचोरा वरील ठिकाणी आई मेहमुदाबी वडिल हणीफ गणी पठाण लहान भाऊ जुबेर हाणीफ पठाण तसेच पत्नी गुलनाजबी शाहरुख पठाण भावजाई तबसुनबी जुबेर पठाण असे एकत्र कुटुंबात राहतो कपाशीच्या गाड्या भरण्याची मजुरी करतात सध्या मी व माझा लहान भाऊ जुबेर असे आम्ही दोघे जण तिडके ता. सोयगाव येथील कपाशीचे व्यापारी शांताराम दामु पाटील याचे कडेस रोजाने गाडीत कपाशी भरण्याचे काम करतो
काल दिनांक 12/02/2024 रोजी आम्ही तारखेडा ता. पाचोरा गावी कपासीची गाडी भरण्यासाठी दुपारी 12:00 वाजे सुमारास मी तसेच माझा भाऊ जुबेर तसेच इतर पाच ते सात जण प्रल्हाद विष्णु पाटील या शैजक-याचे घराचे समोर गल्लीत गाडी भरत असताना त्याचवेळी गलीत दुसरी कपाशी भरण्यासाठी गाडी आली सदरची गाडी ही आमचे ओळखीचे कपाशिचे व्यापारी नाना अभिमन पाटील याची होती त्यावेळी सदरची गाडी गाल्लीत जाण्या करीता आम्ही भरत असलेली कपाशीची गाडी ही मागे पुढे घेण्याचे चालु असतांना तेथे कपाशिचे व्यापारी नाना अभिमन पाटील हा शिवीगाळ करु लागला त्यावेळी आमचे सोबत माझे वाडील हानिफ गनी पठाण हे सुद्धा कपाशीचे गाडीवर कपाशी भरत होते ते कपाशिचे व्यापारी नाना अभिमन पाटील यांना समजावुन सांगण्यास जाता त्याने वडिलांना छातीत चापटा बुक्यांनी मारहाण करुन शीवीगाळ केली तेव्हा वडिलांना भाऊ जुबेर हा सोडविणेस गेला असता त्याला सुद्धा त्याने शीचीगाळ करुन त्याचे गाडीतुन टामी काढुन भाऊ जुबेर याचा डोक्यावर मारुन त्याचे डोके फोडुन गंभीर दुखापत केली, त्याच वेळी त्याचे सोबत असलेला त्याचा मुलगा राहुल नाना पाटील याने रोडवर पडलेली फरशी उचलुन भाऊ जुबेर याचे डोक्यात मारुन दुखापत केली व तुला आत्ता मारुन टाकीन अशी धमकी दीली तेव्हा नाना अभिमन पाटील याचा कपाशीचा मापाडी हा देखील लोखंडी मोजमाप करण्याचा काटा घेवुन मारणेस धावुन आला व ज्या शेतक-याची कपाशी मोजण्यास जात होते त्याने सुद्धा आम्हास शीवीगाळ केली त्यावेळी भाऊ जुबेर हा जबर जखमी झाल्याने तो खाली पडला त्यावेळी आम्ही कपाशी भरणारे लोकांनी त्याला उचलुन खाजगी वाहनाने उपचारा करीता पाचोरा येथे सरकारी दवाखान्यात उपचारा करीता घेवुन आलो. तेव्हा पाचोरा पोलीस स्टेशन कडुन आम्हास भाऊ जुबेर याचेवर उपचार करणे करीता मेमो दिला होता. परंतु भाऊ जुबेर यास जास्त लागल्याने व जबर जखमी झाल्याने त्यास सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांनी पुढील उपचारा करीता जळगाव येथे घेवुन जाणे करीता सांगीतल्याने आम्ही भाऊ जुबेर यास Axon हॉस्पीटल मध्ये उपचारा करीता दाखल केले तेथे भाऊ जुबेर याचेवर औषध उपचार सुरु आहे. परंतु सध्या भाऊ जुबेर हा बोलण्याचे परिस्थीतीत नसल्याने मी त्यास झालेल्या गंभीर दुखापती बाबत तसेच शीवीगाळ व मारहाण व दमदाटी केले बाबत आज रोजी फिर्याद देणे करीता आलो असुन माझी वरिल 1) नाना अभिमन पाटील 2) राहुल नाना पाटील 3) नाना अभिमन पाटील याचा मापाडी तीघेही रा. वाघळी ता. चाळीसगाव 4) एक शेतकरी रा. तारखेडा ता.पाचोरा याचे विरुद्ध फिर्याद आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून भा.द.वी.कलम ३२६,३२३,३५२,५०४,५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमशिंग सुंदरडे करीत आहे.