पिंपळकोठा जवळ खाजगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात!२ जण ठार तर १० प्रवाशी जखमी.

एरंडोल-
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ एका हॉटेल समोर खाजगी ट्रॅव्हल्सने दुभाजक ला धडक दिल्याने व चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये बसचा चालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू झाला असून घटनेत सुमारे १० जण जखमी झाले आहेत. जखमीं प्रवाश्यांना एरंडोल ग्रामीण रुग्णालय आणि जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
निमकथाना जिल्हा राजस्थान येथून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चौधरी यात्रा कंपनीची ट्रॅव्हल्स बस हि दोन दिवसांपूर्वी निघालेली होती. १६ सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बस एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथून जात असताना तेथे एका हॉटेल समोर बसने दुभाजक ला धडक दिली त्यात भीषण अपघात झाला. यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात चालक व क्लीनर यांचा मृत्यू झाला आहे. मयत व्यक्तींपैकी एकाचे नाव मुकेश कुमार गुर्जर (वय ४०, राजस्थान) असे असून दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम राजस्थान समाज बांधवांकडून सुरू होते. तर मुकेश गुजर (वय ३५), बलराम गुर्जर (वय ४०) दीपेंद्र सिंग (वय ४०), अशोक यादव (वय ३५) या चार जखमींवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सहा ते सात जखमींवर एरंडोल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मयत दोघांचा मृतदेह शवविच्छेदन कक्षात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे अपघाताची माहिती जाणून घेतली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम नागरिकांच्या मदतीने करण्यात आले होते. एरंडोल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.