क्राईमजळगाव जिल्हा

वाळू वाहतूकीसाठी लाच घेणारा जळगाव जिल्ह्यातील तलाठ्यास रंगेहात पकडले


जळगाव-

वाळू वाहतुकीसाठी १० हजार रुपयाची लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याला ५ हजार रुपये लाच घेताना दि.२८ मे मंगळवार रोजी जळगाव येथील लाचलुचपत विभाग प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. त्याच्यावर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की , तक्रारदार हा २९ वर्षीय असून  तक्रारदार यांचे सासऱ्याचे नावाने पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकूल मंजुर झालेले होते. घरकूल बांधण्यासाठी रेतीची आवश्यकता होती. या बाबत विटनेर येथील तलाठी आर.के.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता यांनी तक्रारदार यांचेकडेस वाळू ट्रक्टरचे वाहतूकीसाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे दि.२७ मे २०२४ रोजी तक्रार दिली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंचासमक्ष मंगळवार दि.२८ रोजी पडताळणी केली असता तलाठी आर.के.पाटील यांनी पंचासमक्ष ५ हजार रुपयाची लाचेची मागणी केली आणि तक्रारदारकडून ५ हजार रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्या नुसार चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठी रविंद्र काशिनाथ पाटील.वय ५० वर्ष. यांचेवर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे

सदरची कारवाई सापळा पर्यवेक्षक अधिकारी पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे,पो.नि.एन.एन.जाधव,स.फौ. दिनेशसिंग पाटील,पो.हे.कॉ. सुरेश पाटील,पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो. हे .कॉ.शैला धनगर, पो.ना.बाळू मराठे,पो.कॉ.प्रणेश ठाकूर, पोना.किशोर महाजन,पो.ना. सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी,पो.कॉ. सचिन चाटे यांनी केली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!