जळगाव जिल्हाराजकीय

डोकलखेड्यात डंका;शिवसेना-उबाठात जोरदार ‘इनकमींग’…

Pachora|बांग्लादेशात उरण मध्ये घडलेल्या घटनेचा विश्वहिंदू परिषद बजरंगदलाच्या वतीने तीव्र निषेध

पाचोरा-

दिनांक 9 ऑगस्ट 2024

पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा येथील आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात गावातील शेकडो स्त्री-पुरूषांनी आज वैशालीताई सुर्यवंशी यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

डोकलखेडा येथे आज आदिवासी गौरव दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात प्रारंभी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत वीर एकलव्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याचा कार्यक्रमात गावातील शेकडो स्त्री-पुरूषांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. यात आदिवासी तसेच अन्य समुदायातील माता-भगिनींचा समावेश होता.

या कार्यक्रमाला वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह डॉ. अस्मिताताई पाटील, उध्दव मराठे, शरद पाटील, विनोद बाविस्कर, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष दत्तू अहिरे, शिवलालदादा, एकनाथ महाराज, प्रकाश चिंधू पाटील, भारत भीमराव पाटील, प्रकाश चिंधू पाटील, जितेंद्र विक्रम पाटील, विठ्ठल धनसिंग पाटील, शांताराम जयसिंग पाटील, बालू विक्रम पाटील, भगतसिंग सुरेश पाटील, मनोज कैलास परदेशी, शिवलाल देवलाल परदेशी, दीपक उत्तम भील, सलमानदादा (माहेजी); मनोज भारत पाटील, समाधान पाटील (कुरंगी); राजेंद्र पाटील (दहिवद) आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!