सिरोंचा येथे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची सभा संपन्न

सिरोंचा-(प्रतिनिधी-राजमोगली दुर्गम)
सिरोंचा येथे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांच्या विविध अडचणी व प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेमुळे रास्तभाव दुकानदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
सभेला गडचिरोली जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. लिलाधरजी भर्रे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी सिरोंचा तालुका अध्यक्ष राइलय्या पापाय्या होते. तसेच निरीक्षण अधिकारी बागडे साहेब, पारदे साहेब व दिवाकर पनगंटीवार साहेब यांची उपस्थिती होती.
यावेळी सिरोंचा तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांना धान्य वितरण करताना येणाऱ्या विविध अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा संघटना प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष लिलाधरजी भर्रे यांनी दिली.

तसेच रास्तभाव दुकानदारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी जिल्हा संघटना खंबीरपणे दुकानदारांच्या पाठीशी उभी राहणार असून, आगामी काळात रास्तभाव दुकानदारांचा महामेळावा आयोजित करून मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळाच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे भर्रे यांनी सांगितले.दरम्यान, सभेदरम्यान लिलाधरजी भर्रे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित दुकानदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.सभेत भामरागड येथील रास्तभाव दुकानदारांनी तन-मन-धनाने जिल्हा संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले.
सभेचे संचालन साक्षीता यांनी केले, तर प्रास्ताविक रामेश्वरम तोटवार यांनी केले. आभार प्रदर्शन राजमोगली एम. दुर्गम यांनी मानले.यावेळी राइलय्या पापायाजी, रामेश्वरम तोटवार, शब्बीर अहमद, कम्बगोनी वेंकटस्वामी, इंगिली प्रभाकर, तोटा रामन्नाजी, मनोज, मुन्नाबाई, राजमोगली दुर्गम, हिराभाऊ माकडे, हरिदासजी गवारे, ईश्वरजी मेश्राम, माधुरीताई गौरकार, गीताताई वाघाडे, वर्षाताई बुरांडे यांच्यासह रास्तभाव दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



