राज्य

ग्रामपंचायत पेंटिपाका येथे ग्रामसभा संपन्न; विविध विकासकामांना मंजुरी

पेंटिपाका-(प्रतिनिधी राजमोगली दुर्गम)

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत पेंटिपाका येथे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला गावातील नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छता आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य घटकांपर्यंत पोहोचवणे यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
या प्रसंगी सरपंच,बालक्का रेड्डी. उपसरपंच शंकर नरहरी.  , सर्व ग्रामपंचायत सदस्य बेड़के तिरुपती रोजगार सेवक सिनु दुर्गम , ग्रामसेवक दमोदार सिडम, श्रीनिवास सम्बया मुलकाल, डॉ रमेश दुर्गम, नव नियुक्ति तंटा मुक्ती अध्यक्ष सरली दुर्गम शा.व्यवस्था. सा. आध्यक्ष रघु दुर्गम गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेचे कामकाज शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!