राणीचे बाबंरुड येथील आगग्रस्तांना पाचोरा तहसीलदार कडून मदत…
पाचोरा-
पाचोरा-तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील रहिवासी गणेश वना कोळी (वय -४०) यांच्या घराला मध्यरात्री आग लागल्याने त्यांचे अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू साहित्य पूर्णपणे जळून गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच त्यांचे दोन छोटे मुले असून एक मुलगा आठवीला तर एक मुलगी दहावीला यांचे ही शालेय गणवेश शालेय साहित्य पुस्तके व नोट्स इत्यादी वस्तू आगीमध्ये मध्ये जळून नुकसान झाले होते .
या घटनेचा पंचनामा तलाठी पल्लवी वाघ यांनी केला असून तसा अहवाल तहसीलदार पाचोरा यांना सादर केला आहे. घटनेतील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांचा जीवन उदरनिर्वाह हा रोजंदारीवर चालू आहे. तहसीलदार विजय बनसोडे यांनी त्या कुटुंबीयांच्या दोघे मुलांना शाळेचा गणवेश व शालेय साहित्य बॅग पुस्तक वगैरे इत्यादी तात्काळ मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला. पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे ही सर्वसामान्य परिस्थितीतूनच पुढे आले असल्याने त्यांनी या घटनेमुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून स्वतः त्या मुलाला व त्या मुलीला साहित्य वितरित केले. तसेच अजून इतर काही सुविधा पुरवता येईल का? याचीही चौकशी केली तसेच त्यांचे घरकुल यादी मध्ये नाव असून त्यांना घरकुल मिळावे या बाबत शिफारस करणार आहे. व लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळून देण्यात येईल असे तहसीलदार पाचोरा यांनी सांगितले घटनेच्या स्थळी तहसीलदार विजय बनसोडे तलाठी दीपक दवंगे तलाठी पल्लवी वाघ कोतवाल कुंभार ग्रामस्थ व पोलीस पाटील इत्यादी उपस्थित होते.