जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात शिवस्वराज्य यात्रेचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी केले स्वागत;शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत चर्चा

पाचोरा-

पाचोरा, दिनांक २१/०९/२०२४ शनिवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश असलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वागत केले.

आ. जयंत पाटील व खा. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आज जळगाव जिल्ह्यात आले आहेत. आज सकाळी ही यात्रा चाळीसगावला होती. यानंतर तेथील सभा आटोपल्यानंतर ही यात्रा जामनेरकडे जात असतांना पाचोरा येथील निर्मल सीडस येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आ. जयंत पाटील यांचे  स्वागत केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्याथी प्रदेशाध्यक्ष योगेश गव्हाणे, जिल्हा निरिक्षक भास्करराव काळे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, श्रीराम पाटील, एजाज मलीक आदी मान्यवरांचे शिवसेना-उबाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. याप्रसंगी वैशालीताई यांनी जयंत पाटील यांच्याबाबत चर्चा केली.
याप्रसंगी गजू पाटील, अरुण पाटील,  अरुण तांबे, अनिल सावंत, राजेंद्र राणा,  अभिषेक खंडेलवाल, संदीप जैन, मनोज चौधरी, हरीश देवरे, दादाभाऊ चौधरी, हरिभाऊ पाटील, राकेश सोनवणे, प्रशांत पाटील, बंडू मोरे, निखिल सोनवणे, गजेंद्र पाटील, संतोष पाटील, प्रेम पाटील, भगवान पाटील, संजय धुमाळ, आनंदा चौधरी, पुंडलिक पाटील, दगडू शिंदे, संदीप पाटील, अनिल पाटील, संदीप गुजर, प्रमोद नाना, दीपक परदेशी, बापू परदेशी, शरद कोळी, ईश्वर सुरवाडे, सिकंदर तडवी, योजनाताई पाटील, उषा परदेशी, जयश्री येवले, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील
आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!