जळगाव जिल्हा

आ.किशोरआप्पा पाटील, माजी आ. दिलीप वाघ यांचे शक्ति प्रदर्शनात नामांकन दाखल..

Pachora|आ.किशोर आप्पा पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल शक्तिप्रदर्शन, मंत्र्यांची उपस्थिती

पाचोरा-

पाचोरा-भडगाव मतदासंघांत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.२४ ऑक्टोबर गुरुवार रोजी मतदारसंघांचे विद्यमान आणि माजी आमदार यांनी शक्ती प्रदर्शन आणि सभा घेवून आमदारकीचे नामांकन निवडणूक निर्णय अधिकारी भूषण अहिरे यांचे कडे दाखल केले. आमदार किशोरआप्पा पाटील यांची उमेदवारी महायुती कडून ठरलेली  आणि घोषित झाल्याने आमदार किशोर पाटील यांनी मोंढाळा रोड वरील तुळजाई जिनींग येथे नामांकन सभा घेवून आपल्या विकास कामांच्या जोरावर मतदारसंघांत जनता मला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देणार आणि माझी हॅटट्रिक होणार असा विश्वास व्यक्त केला. आमदारांनी तूळजाई  जीनींग पासून कृष्णापुरी, आठवडे बाजार गांधी चौक  जामनेररोड, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या  चौका पर्यंत ढोल ताशांच्या  गजरात सुमारे पंधरा ते वीस हजारांच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अभूतपूर्व रॅली  काढून शक्ती प्रदर्शन  केले. आमदार किशोर पाटील यांच्या नामांकन भरण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे नेते तथा मंत्री गिरिषभाऊ महाजन, खासदार स्मिताताई वाघ, चाळीसगांव आमदार मंगेश चव्हाण यांची विशेष  उपस्थिती होती. आमदार किशोर पाटील यांचे नामांकन दाखल करतांना शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, माजी जिला परिषद सदस्य भूरा आप्पा उपस्थीत होते. तर  माजी आमदार दिलीप वाघ यांची उमेदवारी दाखल करतांना शालिग्राम मालकर, हर्षल पाटील, विकास पाटील उपस्थित होते. तसे अन्य मध्ये प्रताप हरी पाटील उपस्थित होते.

दि.२४ रोजी १८ पाचोरा – भडगांव विधानसभा निवडणुकीसाठी किशोर धनसिंग पाटील( शिवसेना ) दिलीप ओंकार वाघ (अपक्ष) प्रताप हरी पाटील ( महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आणि अपक्ष) शेख राजु शेख सलीम (अपक्ष) असे एकूण पाच नामांकन दाखल झाले आहे. या दरम्यान आजी – माजी  आमदारांच्या नामांकन रॅली साठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!