जळगाव जिल्हाराजकीय
नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या प्रचारार्थ ओझर अंतुर्ली भातखंडे खुर्द या गावांना प्रचार; डॉ. पूनमताई पाटील यांनी घेतल्या मतदारांच्या भेटीगाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पाचोरा-
भडगाव – पाचोरा विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ वार शनिवार रोजी दुपार सत्रात प्रचार ओझर, अंतुर्ली, भातखंडे या गावांना करण्यात आला. प्रचाराचे नेतृत्व नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या कन्या डॉ.पुनमताई प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी ओझर, अंतुर्ली, भातखंडे या गावात ठिकठिकाणी त्यांना औक्षण करण्यात आले. प्रसंगी मतदार मतदानाची शाश्वती भेटीगाठीच्या वेळी देत होते. यावेळी ओझर अंतुर्ली भातखंडे गावातील स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. एकंदरीत नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचाराला उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला.