पाचोरा भडगाव ग्राहक सेवा संघाचा अध्यक्ष पदी सौ.मीना बाग यांची निवड..

पाचोरा-
ग्राहक सेवा संघ पाचोरा-भडगाव या सेवाभावी ग्राहक हितासाठी कार्य करणाऱ्या संस्थेची वार्षिक बैठक सौ. संगिता भारतकुमार प्रजापत यांच्या अध्यक्षतेखाली श्री सु. भा. पाटिल विद्यामंदिर येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाच्या अध्यक्षपदी सौ. मीना अशोक बाग यांची निवड करण्यात आली. बैठकीत संस्थेचे सरचिटणीस आनंद नवगिरे यांनी संस्थेने वर्षभरात केलेल्या कार्या बाबत माहिती दिली. संस्थेचे जेष्ठ सल्लागार व्ही.टी. जोशी यांनी शहरातील नागरी सोयी-सुविधा आणि कर आकारणी संबंधित मार्गदर्शन केले. व या समस्ये बाबतीत शिष्टमंडळाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घ्यावी अशी सुचना करण्यात आली. आर. पी. बागुल यांनी रेल्वे समस्या प्रवाश्यांना येणाऱ्या अडचणी रेल्वे गाड्यांना थांबा या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी संगिता प्रजापत, शे. खलील शे. नुरा, मीना बाग, यांनी मनोगत व्यक्त केले, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक महाजन सर यांनी केले.सदरच्या बैठकीत संस्थेचे संस्थापक प्राचार्य डी.एफ. पाटील, प्रा.एल. बी. शर्मा, उज्वला देशमुख, डॉ. भरतकुमार प्रजापत, विद्या कोतकर, राधेशाम दायमा, आनंद शर्मा, दुर्गा मोरे, अब्बास कपाशी, अशोक मोरे, एकनाथ सदनशीव, माला पंजाबी, मंगला जैन, रविंद्र सोनवणे, मीना मालचे, सुरेखा वाघ, राजश्री पाटील, कविता महाजन, कमल कोळी, मंगल देवरे, संगिता जळतकर, राकेश सावंत, कैलास अहिरे, पत्रकार शामकांत सराफ आदी. उपस्थित होते.