जळगाव शहरात घरफोडी करणारा सराईत आरोपी 159.92 ग्रॅम सोने व 450 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह जेरबंद,

जळगाव-
फिर्यादी पराग जगन्नाथ चौधरी, वय 48 वर्ष, धंदा-व्यवसाय, रा. प्लॉट नं.12 रामानंद नगर, जळगाव यांचे बंद घरात दि-06/10/2024 रोजी दुपारी 13.00 ते 15.00 वा. दरम्यान अज्ञात आरोपीने घराचे लॉक तोडुन आत प्रवेश करुन त्यांचे घरातील कपाटातील व डब्यातील 22 तोळे सोने व 450 ग्रॅम चांदीचे दागिने व रोख रक्कम 16,500/- असा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले बाबत रामांनद नगर पो.स्टे गु.र.नंबर 313/2024 भा.न्या.सं.305(A), 331(3) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यांचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव संदिप गावीत यांचे आदेशाने पोलीस उपनिरिक्षक प्रदिप बोरुडे यांचे कडे देण्यात आला होता. पो.नि. राजेंद्र गुंजाळ रामानंद नगर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. बोरुडे यांनी घटना घडलेला परिसर व रामानंद नगर पो.स्टे. हद्दीतील वेगवेगळया ठिकाणाचे CCTV फुटेज तपासले असता त्यात एक संशयीत इसम मोपेड गाडीवर संशयास्पदरित्या फिरतांना दिसुन आला. त्याचा फोटो जळगाव शहरातील माहितगार इसमांना दाखवला असता तो जळगाव शहरातील नसल्याचे समजले. त्यानंतर भुसावळ टोलनाका व पारोळा टोलनाक्यावरील CCTV फुटेज तपासले असता पारोळा टोल नाक्यावर संशयीत इसम दिसुन आला. सदर आरोपीबाबत पारोळा, अमळनेर, धुळे या परिसरात माहितगार इसमांकडे विचारपुस केली असता त्याचे नाव साहिल प्रविण झाल्टे असुन तो धुळे येथील घर फोड्या करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे समजले. त्याचे राहते घरी वेळोवेळी जावुन शोध घेतला असता तो घरी मिळुन आला नाही. सदर आरोपीबाबत पोनि. रामानंद नगर राजेंद्र गुंजाळ यांनी स्था.गु.शा. जळगाव, स्था.गु.शा. धुळे, चाळीसगांव रोड पो.स्टे. धुळे यांना त्याचा शोध घेण्यास सांगीतले. दि-28/11/2024 रोजी स्था.गु.शा. जळगाव यांनी सदर गुन्ह्यांतील आरोपी साहील प्रविण झाल्टे उर्फ साहील शेख खलील शेख, वय-20 वर्ष, धंदा-मजुरी, रा. पश्चिम हुडको, चाळीसगांव रोड, पवन नगर ता. धुळे जि. धुळे यांस ताब्यात घेवुन रामानंद नगर पोलीसांच्या ताब्यात दिले. सदर आरोपी विरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत.
1)वडनेर खाकुर्डी पो.स्टे., तालुका मालेगाव, जि. नाशिक गुन्हा रजिस्टर नंबर 286/2023 भा.दं.वि. कलम 457,380 प्रमाणे
2)चाळीसगांव रोड पो.स्टे., धुळे 57/2024 भा.दं.वि. कलम 307,324 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोरुडे यांनी सदर आरोपीचा PCR घेवुन आरोपीकडे गुन्ह्यासंबंधाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असुन सदर गुन्ह्यात चोरलेले चांदीचे दागिने त्याच्या घरातुन काढुन दिले. तसेच त्याने चोरलेले सोने हे इतर साथीदारांच्या मदतीने वितळवले असल्याचे सांगीतल्याने 2) पवनराज संजय चौधरी, वय-28 वर्ष, रा.हत्ती गल्ली, पारोळा ता. पारोळा जि. जळगाव, 3) सागर वाल्मीक चौधरी, वय 30 वर्ष, रा. आझाद चौक, पारोळा, ता. पारोळा, जि. जळगांव, 4) केशव बाळु सोनार, वय-36 वर्षे, रा.शाहु नगर, अमळनेर, ता. अमळनेर, जि. जळगांव यांना अटक करुन गुन्ह्यांचे तपासामध्ये खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
159.92 ग्रॅम सोने अंदाजे किंमत
12,05,441/- 407.77 ग्रॅम चांदीचे दागिने अंदाजे किंमत 35,000/-सुझुकी कंपनीची ACCESS-125 मॉडेलची मोपेड अंदाजे किंमत 50,000/-अॅपल कंपनीचा आयफोन मिनी-13 मोबाईल अंदाजे किंमत 50,000/-असा एकुण13,40,441/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर गुन्ह्यांतील फिर्यादी यांचा चोरी गेलेला मुद्देमाल परत करणे बाबत मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी. जळगाव यांनी आदेशीत केल्याने मा. पोलीस अधिक्षक, जळगाव यांचे हस्ते फिर्यादी पराग जगन्नाथ चौधरी यांना 159.92 ग्रॅम सोने व 407.77 ग्रॅम चांदीचे दागिने सुपुर्द करण्यात आले.
सदर गुन्ह्यांचा तपास मा.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक, जळगाव, मा.श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक, जळगाव, मा.श्री. संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव, पोलीस निरिक्षक राजेंद्र गुंजाळ, रामानंद नगर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरिक्षक प्रदिप बोरुडे, पो.हे.कॉ.जितेंद्र राजपुत, पोहेकॉ इरफान मलिक, पोहेकॉ सुशिल चौधरी, पो.हे. कॉ प्रविण भोसले, पोनारेवानंद साळुखे, पोशि उमेश पवार, पोशि रविंद्र चौधरी, पोशि प्रविण सुरवाडे यांनी केलेला आहे.