क्राईमजळगाव जिल्हा

माहिजी येथे भर दिवसा शेतकऱ्यांच्या घरात चोरी पोलीसांकडून चोरट्यांचा तपास सुरू.

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील मिहिजी येथे दिनांक ७ ऑक्टोबर शनिवार रोजी भर दुपारी गावाच्या मध्यभागी असलेल्या शेतकऱ्याच्या घरातून ८० हजार रोख रक्कम, सोने चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पाचोरा पोलिसांसह जळगाव वरून श्वान पथक दाखल झाले माहिजी येथील रहिवासी संजय मन्साराम पाटील या अल्पभूधारक शेतकरी आपल्या घरच्या शेतातील काम आटोपून दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरी आल्यावर घरात असलेल्या लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेला पाहून त्यांनी गावातील पोलीस पाटील राजेंद्र पाटील यांना माहिती देऊन गावात एकच चर्चा होऊन ग्रामस्थांनी संजय पाटील यांच्या घराकडे धाव घेतली पोलीस पाटील यांनी तात्काळ पाचोरा पोलीसांना घटनेची माहिती दिली पाचोरा पोलिसांनी दिली माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी पीएसआय जितेंद्र वल्टे, सचिन पवार, भगवान बडगुजर , श्यामकांत पाटील, यांना घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली जळगाव येथून यावेळी श्वान पथक दाखल झाले होते श्याम पथकाने गावाच्या शेजारी असलेल्या वरसाडे प्र बो गावाकडे चोराटे गेल्याचा मार्ग दाखवला चोरीच्या प्राथमिक अंदाजावरून कपाटात असलेल्या ८० हजार रोख रक्कम सह ८ ग्रॅम सोन्याचे कानाचे टोंगल ७ ग्रॅम इतर सोने असे एकूण १५ ग्रॅम सोने चोरी झाल्याचा अंदाज आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, भगवान बडगुजर, श्याम कांत पाटील , सचिन पवार करीत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!