जळगाव जिल्हा
घुसर्डी येथे विजेच्या धक्का लागल्याने तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू.
भडगाव-
दिनांक ८ ऑक्टोंबर २०२३ रविवार रोजी भडगाव तालुक्यातील कजगाव जवळील घुसर्डी या गावातील शेत शिवारात शेतकरी आपली नेहमीचे केळी पिक उत्पन्नासाठीची कामे करण्यासाठी गेला असता सकाळी ९:०० वाजेच्या सुमारास शेतातच विजेचा धक्का लागल्याने चि. विकास धर्मा निकुंभ (वय 25) या शेतकरी तरुणाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सदर तरुणास तात्काळ उपचारासाठी कजगाव रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ६:०० वाजता रहात्त्या घरापासून घुसर्डी येथून निघणार आहे. सदर तरुण हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, ४ काका, १ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. मयत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शेककळा पसरली आहे,