क्राईमजळगाव जिल्हा

गुटख्याची चोरटी वाहतुक करणाऱ्या इसमास चाळीसगाव शहर पोलीसांनी केले जेरबंद.

चाळीसगाव-

दिनांक- १६/०७/२०२५ रोजी पहाटे ०६:३० वाजेच्या सुमारास नागद गावाकडुन चाळीसगाव शहरात गुटखा ने भरलेली महेद्रा कंपनीची बोलेरो मालवाहु गाडी चाळीसगाव शहरात येत असल्याबाबत पोलीस निरीक्षक अमीतकुमार मनेळ यांना गुप्त माहिती माहिती मिळाली असता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस अंमलदार आशुतोष सोनवणे, रविद्र बच्छे, समाधान पाटील सर्व नेम. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या सदर माहीतीच्या अनुषंगाने वरील पथकातील अधिकारी व अंमलदार यांना वाहनाबाबत सखोल व गोपनीय रित्या माहीती संकलीत करुन वाहन क्रमांक एम एच ४१ ए यु ३२१० हीस चाळीसगाव शहरात हीरापुर रोड नवजीवन सुपर शॉपी समोर वाहन रस्तावर थांबवुन खात्री केली असता सदर वाहनात गुटख्याने भरलेल्या गोण्या मिळून आल्या.

त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी यांना बोलावुन मिळुन आलेल्या गुटखा या मालाचा सविस्तर पंचनामा केला असता वाहनात ७,१९,०२९ रु किंमतीचा गुटखा व वाहन किंमत ८,००,०००/- रुपये ची महेद्रा कंपनीची बोलेरो मालवाहु गाडी वाहन क्रमांक एम एच ४१ ए यु ३२१० असा एकुण १५,२९,०२९ असा मुद्देमाल मिळुन आला वाहनाचा चालक व त्याचा सोबत असलेला इसम अरबाज इब्राहीम पठाण रा. सार्वे ता. पाचोरा व गुटखा मालाचा मालक दिपक बेदमुथा रा. नागद जि. छत्रपती संभाजी नगर यांच्या विरोधात प्रचलीत कायद्यान्वये शरद मधुकर पगार (अन्न सुरक्षा अधिकारी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास वरीष्ठांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश पाटील हे करीत आहे.सदरची कारवाई महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक जळगाव, कविता नेरकर (पवार), अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव, विनायक कोते उपविभागीय पोलीस अधिक्षक चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमीतकुमार मनेळ यांचे नेतृत्वाखाली करण्यात पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस अमंलदार राहुल सोनवणे, योगेश बेलदार, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, समाधान पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी केली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!