जवाहर हायस्कूल गिरडचे उपमुख्याध्यापक बी एन पाटील यांची माध्यमिक विद्यालय अंजनविहीरे येथे मुख्याध्यापक पदी पदोन्नती

भडगाव-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरड शाळेचे उपमुख्याध्यापक बी एन पाटील यांची माध्यमिक विद्यालय अंजनविहीरे शाळेत संस्थेच्या सेवा जेष्ठतेनुसार संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांच्या आदेशान्वये दिनांक १ ऑक्टोबर २०२५ पासून माध्यमिक विद्यालय अंजनविहीरे येथे मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाली असून त्यांच्या या पदोन्नती बद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील संस्थेचे सचिव प्रशांत विनायकराव पाटील संस्थेच्या व्हाईस चेअरमन डॉ. पूनमताई प्रशांत पाटील संस्थेचे समन्वयक कमलेश शिंदे, माध्यमिक सोसायटीचे संचालक जगदीश अशोकराव पाटील, माजी नगराध्यक्ष शामकांत अशोक पाटील, जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गिरडचे प्राचार्य एस पी पाटील तसेच संस्थेचे प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भातखंडे गावाचे माजी विद्यार्थी व ग्रामस्थ, आमडदे, गिरड, तळई गावाचे ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





