आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन..

पाचोरा-
पाचोरा भडगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था पाचोरा तसेच द युनिक अकॅडमी शाखा जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा-भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत व खुली सामान्य ज्ञान स्पर्धा, रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर व्यापारी भवन पाचोरा येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत आकर्षक बक्षीस तसेच 3 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत यूपीएससी आणि एमपीएससी बाबत मोफत मार्गदर्शन देखील द यूनिक अकॅडमी जळगांव यांचा वतीने करण्यात येणार आहे.परीक्षा प्रत्यक्ष ऑफलाईन स्वरूपात असेल, विद्यार्थ्यांनी एक तास आधी उपस्थित राहावे, परीक्षा 11 वाजता वेळेवर सुरू होईल, परीक्षेसाठी 1तासाचा कालावधी असेल, परीक्षेत मोबाईलचा वापर करता येणार नाही, शंभर प्रश्नांची परीक्षा असून त्यामध्ये जनरल नॉलेज, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातील. यासाठी ऑनलाईन लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली नाही त्यांना परीक्षेत बसता येणार नाही परीक्षेसाठी वयोमर्यादा असेल 18 ते 34 वर्ष, सोबत येताना पॅड,पेन, कोरा कागद,आणावे पाचोरा भडगाव मतदार संघातील विद्यार्थ्यांना आमदार किशोर आप्पा पाटील यांचा वतीने आवाहन करण्यात येते की मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा जेणेकरून भविष्यात याचा बुद्धिमत्ता विकासासाठी चालना मिळेल.
ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/HdyMaFaJrGE4UcJWdyUT9R?mode=wwt
नाव नोंदणी साठी गुगल फॉर्म भरावा
https://forms.gle/V9iZm4MJ8mNSqMq97
अधिक माहितीसाठी संपर्क 8929728418





