प्रथम वर्धापन दिन सोहळा,निमित्ताने मोफत तीन दिवशीय आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

पाचोरा-
अथर्व लहान मुलांचे हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर दिनांक 10 नोव्हेंबर सोमवार ते 12 नोव्हेंबर बुधवार पर्यंत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून पाचोऱ्यातील जारगाव येथील अथर्व लहान मुलांचे हॉस्पिटलच मार्फत तीन दिवशीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. यावेळी डॉ. चेतन राजपूत हे रुग्णाची तपासणी करून डॉक्टर सल्ला देणार आहेत. यात गरजू रुग्णांसाठी 50% सवलती दारात रक्त लघवी व एक्स-रे केले जाणार आहे. या हॉस्पिटलचा पत्ता गोंदेगांव-बनोटी रोड, संघवी ट्रेडिंग कंपनी समोर, जारगांव चौफुली, पाचोरा संपर्क- 9561152308, 94059946390
रुग्णालयातील उपलब्ध सुविधा
बाह्य रुग्ण विभाग
आंतरुग्ण विभाग
नवजात शिशु अतिदक्षता कक्ष (N.I.C.U)
लहान मुलांचे अतिदक्षता कक्ष (P.I.C.U)
सेंट्रल ऑक्सिजन सुविधा
मेडिक्लेम सुविधा
स्पेशल रूम/सर्व लसीकरण हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे,
या मोफत आरोग्य शिबीराचा लाभ गरीब गरजू रुग्णांनी घ्यावा असे आवाहन अथर्व लहान मुलांचे हॉस्पिटलचे संचालक डॉ. चेतन राजपूत यांनी केले.





