जळगाव जिल्हा

पिंपळगाव हरेश्वर हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात पाचोऱ्यात आमरण उपोषण सुरू; प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे सट्टा मटका,पत्यांचे कल्ब, विमल गुटखा,विनापरवाना देशी विदेशी गावठी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत आणि प्रभारी अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते कैलास तांबे पत्रकार,चंदू खरे,निलेश पाटील,कुंदन बेलदार हे आजपासून पाचोरा तहसील कार्यालय परीसरात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.वारंवार निवेदन देऊनही ठोस कारवाई होत नसल्यामुळे अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे उपोषणकर्त्य यांनी सांगितले.आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत अवैध धंदे पूर्णपणे बंद होत नाहीत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही.प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!