जळगाव जिल्हाशैक्षणिक

पाचोरा चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे ‘प्रवास कलेचा’ चित्रप्रदर्शनात चित्रकार श्याम कुमावत यांचे प्रात्यक्षिक

पाचोरा-

येथील पाचोरा चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जळगाव येथील ‘ पु. ना. गाडगीळ (गाडगीळ आर्ट गॅलरी) हॉलमध्ये ‘प्रवास’ नावाचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांना कलेतील बारकावे समजावेत यासाठी प्रसिद्ध चित्रकार श्याम कुमावत सरांचे विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमावत सरांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे चित्रकलेचे विविध पैलू उलगडून दाखवले. त्यांचे हे सादरीकरण अतिशय प्रभावी आणि प्रेरणादायी ठरले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप पाटील  यांनी श्याम कुमावत यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी वंदना परमार यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रदर्शनासाठी कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी, सागर मोरे, संतोष साळुंखे, निलेश कुवर, निलेश शिंपी, मृणाल काळे, डॉ. राजेश वाडे, मनोज जंजाळकर, प्रा.रविंद्र कासार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा ठाकूर हिने केले, नेहा पाटीलणे मनोगत व्यक्त केले व  आभार प्रदर्शन संदीप पाटील यांनी केले.या प्रदर्शनात महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार सादर केले होते. यामध्ये प्रामुख्याने नेहा पाटील, भूमी पाटील, साक्षी पाटील, प्रतिक्षा पाटील, योगीता पाटील, पूजा देसाई, मनोज मालचे, अश्विन कुमार, प्रेरणा मोरे, विशाल तडवी, श्रुती कुलकर्णी, श्रुती सोनकुळे, गुणवंती पाटील, शिवानी शर्मा, रोहिणी पाटील, दिव्या पाटील यांसह सर्व विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाचा लाभ घेतला.यशस्वी प्रदर्शनाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे कौतुक होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!