स्टॅम्प वेंडरला जास्तीचा दरात स्टॅम्प विकणे पडले महागात,ACB ने पकडले रंगेहाथ, प्रशांत झेरॉक्स येथील घटना..

पाचोरा-
पाचोरा शहरातअधिकृत मुद्रांक विक्रेत्यांकडून मुद्रांक विक्री करताना अतिरिक्त शुल्क आकारल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाचा वतीने रंगेहाथ कारवाई करण्यात आली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांनी जामनेर-पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स येथे ५००/-रू. दराचे १० स्टॅम्प घेण्यासाठी गेले असता. त्यावेळी दुकानावरील अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांनी त्यांना ५००/- रू. चा स्टॅम्पची किंमत ५५०/- रू. सांगितली. तेव्हा तक्रारदार हे त्यांना ५००/-रू चा स्टॅम्प तुम्ही ५५०/- रू ला देतात का? शासकिय नियमानुसार स्टॅम्पची किंमत ५००/-रू असतांना तुम्ही ५०/- रू जास्त का घेत आहेत ? असे विचारले असता स्टॅम्प वेंडर योगेश संघवी त्यांना म्हणाले की, ५५०/- रुपयेच लागतील, त्यात काही कमी होणार नाही. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, स्टॅम्प वेंडर योगेश संघवी हे स्टॅम्प पेपरच्या शासकिय नियमानुसार असलेल्या किंमतीपेक्षा अतिरिक्त पैशांची मागणी करीत आहेत. त्यावेळी त्यांच्याकडे आधारकार्ड नसल्यामुळे त्यांनी तक्रारदार यांना आधारकार्ड घेवुन या, तेव्हाच तुम्हाला स्टॅम्प भेटतील, असे सांगितले होते. त्यामुळे त्यादिवशी तक्रारदार हे तेथुन परत घरी निघुन गेले. स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना लाच रक्कम देण्याची मनापासुन इच्छा नाही, परंतु त्यांनी जर त्यांना ५००/-रू च्या स्टॅम्पसाठी ५५०/-रू दिले नाहीत तर ते तक्रारदार यांना स्टॅम्प देणार नाहीत. तक्रारदार हे दि.१७/०३/२०२६ रोजी पाचोरा शहरातील जामनेर-पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स येथील अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांच्याकडे तक्रारदार यांचे वैयक्तीक कामासाठी ५००/- रू दराचे १० स्टॅम्प घेण्यासाठी जाणार आहे. त्यावेळी स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांनी ५००/- रुपये दराच्या १० स्टॅम्पसाठी ५०००/- रुपये पेक्षा शासकिय नियमांच्या व्यतिरिक्त अधिक ५००/- रूपये लाचेची मागणी केलेबाबत तक्रारदार यांनी दि.१७/०३/२०२६ रोजी ला.प्र.वि. जळगाव यांच्याकडे तक्रार लिहुन दिली होती.
त्याप्रमाणे दि.१७/०३/२०२६ रोजी सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे तक्रारदार यांच्याकडे योगेश ईश्वरलाल संघवी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे ५००/-रू दाराच्या १० स्टॅम्पचे ५,०००/- रू होत असतांना ५,५००/-रूपयांची मागणी करून अधिकचे ५००/-रूपयांची मागणी केली योगेश यांचा भाऊ प्रशांत ईश्वरलाल संघवी याने देखील तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ५००/-रू दाराच्या १० स्टॅम्पचे ५,०००/- रू होत असतांना ५,५००/-रूपयांची मागणी करून अधिकचे ५००/- रूपयांची मागणी करून सदरची लाच रक्कम पंचासमक्ष स्वतः स्विकारली म्हणुन गुन्हा नोंदविण्यात आला.सापळा अधिकारी हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव सापळा पथक पो.अं.बाळु मराठे, पो.अं. भुषण पाटील, ला.प्र.वि. जळगांव तपास अधिकारी : श्रीमती स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक. सुनील दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक. यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई यशस्वी करण्यात आली.



