जळगाव जिल्हा

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जनजागृती..

पाचोरा-

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पाचोरा ग्रामीण रुग्णालयात क्षयरोग (टिबी) बाबतीत जनजागृती करण्यात आली.
क्षयरोग कसा होतो,लक्षणे कश्या प्रकारे असतात,त्यावर उपचार कश्या पद्धतीने घ्यावे,या विषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.

क्षयरोग (टिबी)चे लक्षणं

दोन आठवड्यापेक्षा जास्त दिवस असलेला खोकला, रात्री येणारा ताप,भुक न लागणे,वजन कमी होणे,यासारखे लक्षणे आढळून आल्यास जवळचा सरकारी दवाखान्यात मोफत थुंकी नमुना तपासणी,व एक्सरे तपासणी करुन निदान केले जाते. निदान झाल्यास सहा महिने मोफत उपचार सरकारी दवाखान्यात करण्यात येते,तसेच क्षयरोग निदान झालेल्या रुग्णांना दहामहा १,०००/-रुपये निक्षय पोषण योजने अंतर्गत देण्यात येते.
उपचार केल्यास क्षयरोग (टिबी) रोग पुर्णपणे बरा होता,या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास,सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. सतिष टाक, तालुका अधिकारी डॉ.संदेश सोनवणे डॉ. अमित साळूंखे, डॉ.विजय पाटील, डॉ. इम्रान शेख, तालुका टिबी सुपरवायझर हर्षल पाठक,शमीम तडवी, तसेच डि.वाय.पाटील, ज्ञानेश्वर चौधरी,जयदीप साबळे, श्रीकांत भोई, यांचेसह इतरांची उपस्थिती होती.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग जनजागृती करण्यात आली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!