क्राईमराज्य

अशोक खरात प्रकरणातील पिडीत महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल,सहा जणांवर गुन्हे दाखल..

नाशिक-

अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरात याच्याविरोधात विविध गंभीर गुन्हे दाखल असून त्याचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
२६ मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सातपूर परिसरातील ‘वॉलमन’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सिद्धार्थ जी. रामोशे याने पीडित महिलांचे आठ अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे समोर आले. त्यानंतर ग्रुपमधील रमीज शेख, राहुल पवार, प्रविण काटे, राहुल हिवाळे आणि साहिल सय्यद यांनी हे व्हिडिओ इतर ग्रुपवर प्रसारित करून व्हायरल केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी नाशिक मधील सातपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं.४०९/२०२६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २९४ (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून अनेक महिला पीडित असण्याची शक्यता असल्याने पोलीसांकडून गोपनीयतेने तपास केला जात आहे. पीडित महिलांची ओळख उघड होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे पोलीसांनी सांगितले.दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, तसेच संबंधित व्हिडिओ तात्काळ हटवावेत, असे आवाहन पोलीसांनी केले आहे. अन्यथा संबंधित व्यक्तींसह ग्रुप अॅडमिनवरही गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीसांनी दिला आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!