जळगाव जिल्हा

पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावे, प्रभारी अधिकारी यांची बदली करण्यात यावी,14 एप्रिल रोजी पाचोऱ्यात उपोषण..

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून पोलीस प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
वारंवार तक्रारी निवेदन देवुनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “अवैध धंदे सुरू ठेवण्यासाठीच संरक्षण दिले जात आहे का?” असा थेट सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर, संबंधित प्रभारी अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात यावी व परिसरातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, या मागण्यांसाठी 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी पाचोरा येथे प्रांताधिकारी कार्यालय परीसरात उपोषण छेडण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते कैलास तांबे, पत्रकार निलेश पाटील,चंदू खरे, कुंदन बेलदार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दिनांक 23 मार्च 2026 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी भाग पाचोरा यांना निवेदन देण्यात आले आहे.
अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात बाबत निवेदन दिल्यानंतर ही अवैध धंदे करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होतांना दिसुन येत नाही,म्हणजे मी मारल्या सारखं करतो,तु रडल्या सारखं कर अश्या पध्दतीने थातुरमातुर कारवाई होत असल्याबाबत दिसत आहे, यामुळे स्थानिक नागरीकांमध्ये नाराजी दिसत आहे.अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करा,व पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची तातडीने बदली करुन त्यांच्या जागी कर्तव्यदक्ष अधिकारी यांची नेमणूक करा या मागणीसाठी होणाऱ्या
उपोषणाला मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
अक्षयतृतीयाच्या अनुषंगाने पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात पत्याचे(जुगार) क्लब सुरू होतील अशी माहिती देखील समोर आली आहे.जुगारात मोठ्या प्रमाणात नागरीक पैसे जिंकण्याचा मोहात कर्जबाजारी होतात,तर काही जण कर्जबाजारीचा नैराश्यातुन आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल देखील उचलत असल्याचे परीसराततुन बोलले जात आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!