क्राईम

करमाडमध्ये पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेचा पतीनेच चाकूने गळा चिरून केला खुन;

छत्रपती संभाजीनगर-

करमाड परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास रक्ताचा सडा पडला. आपल्या संसाराचा गाडा ओढण्यासाठी पंपावर राबणाऱ्या पूजा गवांडे या महिलेची तिचाच दुसरा पती सत्यम गवांडे याने अमानुषपणे हत्या केली. एका बाजूला लग्नानंतर विभक्त राहणारे पती-पत्नी आणि दुसऱ्या बाजूला घटस्फोटासाठी असणारा अट्टाहास, या वादाचा शेवट एका भीषण हत्याकांडात झाला.मिळालेल्या माहितीनुसार, पूजा यांचा हा दुसरा संसार होता. पहिल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी काही महिन्यांपूर्वी सत्यमसोबत आळंदीत लग्नाची गाठ बांधली होती. पूजा यांना पहिल्या पतीपासून दोन मुलेही आहेत. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच या नात्यात दुरावा आला. सत्यमला आता तिसरे लग्न करायचे होते, त्यासाठी तो पूजाकडे घटस्फोटासाठी सतत तगादा लावत होता. मात्र, पूजाने समाजाचा आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून साथ सोडण्यास नकार दिला.घटस्फोटाला नकार मिळत असल्याने सत्यमच्या डोक्यात सूडाचे चक्र सुरू होते. गुरुवारी पूजा पेट्रोल पंपावर आपल्या कामात व्यस्त असताना सत्यम तिथे पोहोचला. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि सत्यमने जवळ असलेला धारदार चाकू काढून पूजा यांच्या गळ्यावर भीषण वार केले. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक सुन्न झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजा यांचा जागीच प्राण गेला.चित्तेपिंपळगाव येथे राहणारी पूजा सुदाम गावंडे ही तरुणी करमाड येथील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर आपली ड्युटी करत होती. दुपारी १२:३० च्या सुमारास, जेव्हा महामार्गावर मोठी वर्दळ असते, तेव्हा आरोपीने अचानक पूजावर हल्ला चढवला. काही समजण्याच्या आतच त्याने चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच प्राण गेला.घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीचा करमाड पोलिसांनी अत्यंत वेगाने शोध घेतला. तांत्रिक माहिती आणि खबर मिळताच पोलिसांनी अवघ्या ६० मिनिटांच्या आत सत्यम गवांडे याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि त्यामागचे सविस्तर कारण याचा तपास पोलीस करत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!