जळगाव जिल्हा

कल्याणकारी योजनांचा लाभासाठी कामगार नोंदणी
आवश्यक-मुख्याधिकारी मंगेश देवरे

पाचोरा-

कामगारांसाठी अस्तित्वात असलेल्या कल्याणकारी योजनांचे लाभ व अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी अधिकृत कामगार नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. कामगारांना शासकीय अनुदानातून घर बांधकाम, मुलांचे शिक्षण तसेच विविध प्रकारचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. यासह अनेक योजनांचा लाभ केवळ नोंदणी धारक कामगारांना मिळतात. असे प्रतिपादन पाचोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिनांक 14 रोजी पाचोरा येथे केले. क्रेडाई पाचोरा तर्फे आयोजित बांधकाम कामगारांसाठीच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.क्रेडाई महाराष्ट्र द्वारा राज्यात कामगारांसाठी कृतज्ञता सप्ताह साजरा होत आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून क्रेडाई पाचोरा तर्फे दिनांक 14 रोजी व्यापारी भवन, भडगाव रोड, पाचोरा येथे बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी व आर्थिक साक्षरता विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. याप्रसंगी चार्टर्ड अकाउंटंट  प्रशांत अग्रवाल, क्रेडाई पाचोरा चे संस्थापक अध्यक्ष संजय कुमावत, विद्यमान अध्यक्ष सचिन बाहेती, सेक्रेटरी रितेश ललवाणी, सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. श्रद्धा पाटील (स्वराज नेत्रालय), अक्षय पाटील (डायबेटिक स्पेशललिस्ट), डॉ. भिकन कपाटे, माजी अध्यक्ष सचिन कदम, डॉ. अभय भोसले, डॉ. विजय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. दीप प्रज्वलन, श्री गणेश पूजन व श्री विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. संजय कुमावत यांची नुकतीच महाराष्ट्र क्रेडाई च्या कन्व्हेनर पदी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी म्हाडा अंतर्गत 350 उत्कृष्ट घरे बांधणाऱ्या पाचोरा येथील मंगलम पार्क या फर्मचे तर, संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपरिषद हद्दीत पाचोरा येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन ने उभारलेले बीओटी तत्त्वावरील राजीव गांधी टाऊन हॉल व व्यापारी संकुल याचा विशेष उल्लेख केला. कामगारांसाठीच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांचे विवेचन त्यांनी यावेळी केले. या सर्व योजनांचे अनुदान व लाभ घेण्यासाठी सलग तीन वर्ष कामगार म्हणून नोंदणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.क्रेडाई पाचोरा चे अध्यक्ष सचिन बाहेती यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लक्ष्मी कन्स्ट्रक्शन चे संचालक संजय कुमावत यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कामगारांना कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा विषयक नियमांचे पालन व सुरेक्षेसाठी च्या साधनांचा वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते चार्टर्ड अकाउंटंट प्रशांत अग्रवाल यांनी कामगारांना उद्देशून बोलताना बचतीचे महत्त्व, आलेल्या मजुरीचा योग्य विनियोग, व जीवनातील आर्थिक साक्षरतेचे महत्व पटवून सांगितले. सेक्रेटरी रितेश ललवाणी यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शिबिर स्थळी उपस्थित कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने 145 कामगारांची नोंदणी झाली. उपस्थित कामगारांना सेफ्टी किट चे वाटप व वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रेडाई पाचोरा चे अपूर्व थेपडे, दीपक वाघ, प्रफुल्ल संघवी, प्रमोद सोनार, मनोज पाटील, रवी केसवानी, जितेंद्र अग्रवाल, अनिल बच्छाव, किशोर पाटील, राजेश पाटील, प्रदीप पाटील मनोज पाटील, यांचे सह स्वराज नेत्रालय, विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सुमारे 300 कामगारांनी या शिबिराचा लाभ झाला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!